क्या बात! 14 वर्षांच्या शतकवीर वैभव सुर्यवंशीचे पुण्याशी खास नाते
सध्या आयपीएलचा 18वा हंगाम सुरू आहे. या हंगामातील 47वा सामना राजस्थान राॅयल्स आणि गुजरात टायटन्स (RR vs GT) संघात खेळला गेला. या सामन्यात राजस्थान राॅयल्सने 8 गडी राखून दमदार विजय मिळवला. जयपूरच्या मैदानावर खेळला गेलेला हा सामना ऐतिहासिक ठरला. कारण या सामन्यात 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) धमाकेदार कामगिरी केली. त्याने 35 चेंडूत शतक झळकावले आणि अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले.
तत्पूर्वी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये वैभव सूर्यवंशी आणि त्याचे वडील दिसत आहेत. हा फोटो स्टेडियमधील आहे. या फोटोमधील वैभव सूर्यवंशी 6 वर्षाचा आहे. त्यावेळी 2017 मध्ये तो आयपीएल फ्रँचायझी रायझिंग पुणे सुपरजायंट्सला (RPS) सपोर्ट करत होता आणि आता 14व्या वर्षी त्याने आयपीएल 2024 मध्ये राजस्थान राॅयल्सकडून (RR) खेळताना शानदार शतक झळकावले.
आयपीएल 2017 मध्ये आरपीएसला समर्थन देणारी 6 वर्षांची वैभव सूर्यावंशी. pic.twitter.com/cafygzdqrb
– मुफद्दाल वोहरा (@mufaddal_vohra) 29 एप्रिल, 2025
वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) 38 चेंडूत 101 धावांची तुफानी खेळी केली. आपल्या खेळीत त्याने 7 चौकारांसह 11 षटकार ठोकले. एवढ्या कमी वयात वैभवने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांना चकित केले. आता राजस्थानचा पुढचा सामना चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सशी (1 मे) होणार आहे. या सामन्यात देखील वैभवच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील.
Comments are closed.