वैभव सूर्यवंशींची खास झलक,भारतीय संघासोबत एजबेस्टनवर उपस्थिती!
वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) भारतीय अंडर-19 संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. गुरुवारी तो एजबेस्टनच्या मैदानावर संघासोबत दिसला. वैभव अंडर-19 संघातील सर्व खेळाडूंना घेऊन सीनियर भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात चालू असलेला दुसरा कसोटी सामना पाहायला आला होता. या सामन्यात सर्वांनी कर्णधार शुभमन गिलची (Shubman gill) शानदार फलंदाजी पाहण्याचा आनंद घेतला. गिलने इंग्लंडविरुद्ध 269 धावांची खेळी केली.
वैभव अंडर-19 संघासोबत भारत-इंग्लंड सामन्याचा आनंद लुटायला आला होता. बीसीसीआयने (BCCI) त्यांच्या एक्स हँडलवर याचा व्हिडिओ शेअर केला. या वेळी सर्व खेळाडू गिलच्या फलंदाजीचा आनंद घेताना दिसला. वैभव पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहण्यासाठी आला होता. त्याने यावेळी त्याचा अनुभवही सांगितला.
वैभव म्हणाला, मला खूप चांगलं वाटत आहे. पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहत आहे, खेळ कसा चाललाय हे बघतोय. आम्ही सगळे लोक सामना बघायला आलो आहोत.
वैभवने गिलना आपला आदर्श सांगितले आणि त्यांचं कौतुकही केलं. वैभव म्हणाला, मला खूप मोठी प्रेरणा मिळत आहे, कारण तो एक प्रकारे आमच्यासाठी आदर्श आहे. पुढे त्याने असंही सांगितलं, प्रत्येकाचं स्वप्न असतं आपल्या देशासाठी रेड बॉल क्रिकेट खेळायचं.
14 वर्षांचा वैभव सूर्यांवंशी भारतीय अंडर-19 संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला असून तिथे त्यांना 5 वनडे आणि 2 कसोटी सामने खेळायचे आहेत. भारत आणि इंग्लंडमध्ये आतापर्यंत 3 वनडे सामने झाले आहेत. या तिन्ही सामन्यांत वैभवने तुफान फलंदाजी केली आहे. पहिल्या सामन्यात त्याने फक्त 19 चेंडूत 48 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात 34 चेंडूत 45 धावांची खेळी केली. तसेच तिसऱ्या सामन्यात देखील त्याने अर्धशतक झळकावलं. त्या दरम्यान त्याने फक्त 31 चेंडूत 278 स्ट्राइक रेटने 86 धावा केल्या.
Comments are closed.