वैदेही चौधरी आणि मान केशरवानी या विजेत्या ठरल्या.

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

शनिवारी येथे झालेल्या फिनेस्टा खुल्या राष्ट्रीय टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत सहावा मानांकित मान केशरवानीने पुरुष एकेरी तर टॉप सिडेड वैदेही चौधरीने महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले.

पुरुष एकेरीच्या झालेल्या अंतिम सामन्यात मान केशरवानीने तृतीय मानांकित नितीन सिन्हाचा 6-0, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. हा सामना 100 मिनिटे चालला होता. केशरवानीचे हे फिनेस्टा स्पर्धेतील पहिलेच विजेतेपद आहे.

महिला एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात टॉप सिडेड वैदेही चौधरीने 20 वर्षीय श्रृती अहलावतचा 6-4, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अजिंक्यपद मिळविले. सव्वादोन तास चाललेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडुंनी दर्जेदार खेळाचे प्रदर्शन घडविले. वैदेही चौधरीचे हे या स्पर्धेतील तिसरे जेतेपद असून या पूर्वी म्हणजे 2022 आणि 2024 साली तिने ही स्पर्धा जिंकली होती. आता पुढील आठवड्यात दिल्लीत फिनेस्टा खुली 14 आणि 16 वर्षाखालील वयोगटातील टेनिस स्पर्धा खेळवली जाणार आहे.

Comments are closed.