अमानुषपणे मारहाण; अंगावरती थुंकली, सणावेळी चांदीच्या गौराई अन् छळाचं सत्य समोर, वैष्णवीच्या आई-
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;"> <एक शीर्षक ="पुणे" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/pune" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">पुणे: अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलले. तिच्या जाण्यानं पिंपरी चिंचवड मधील कस्पटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आई-वडिलांना अश्रू अनावर होत असताना वैष्णवीने दोन वर्षात जे भोगलं ते सगळं सांगितलं. वैष्णवीच्या आईने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, लग्न झालं तेव्हा सुरूवातीला ती होत असलेल्या त्रासाबाबत आम्हाला काहीच सांगायची नाही. तिने प्रेमविवाह केला होता, म्हणून ती तिच्या त्रासाबाबत काहीच सांगत नसायची. आम्हाला त्रास नको म्हणून ती सगळं लपवत होती. तिने जेव्हा लग्न झाल्यावरती पहिल्यांदा गौरी गणपतीच्या सणावेळी चांदीच्या गौराई मागितल्या, तेव्हा आम्ही तिला सांगितलं होतं, मातीच्या गौराई असतात चांदीच्या नसतात. त्यानंतर ती मला रडून सगळं सांगायला लागली. ते खूप छळ करतात, मानसिक, शारिरीक त्रास देतात, त्यानंतर ती हळूहळू तिच्यासोबत जे घडतंय त्याबाबत सांगायला लागली. तिने सगळं कधीच स्पष्ट सांगितलं नाही. दरवेळी तिला मारहाण होत होती, अशी माहिती तिच्या आईने दिली आहे.
तिच्या सासूचे आणि नणंदेचे पाय धरले
पुढे वैष्णवीच्या वडिलांनी म्हटलं की, वैष्णवीच्या नणंदेने तिला दोन महिन्यांपूर्वी अमानुषपणे मारहाण केली, तिच्या अंगावरती थुंकली. त्यानंतर तिच्या सासूने आणि नणंदेने तिला बालेवाडीपर्यंत आणली. तिला कारमध्ये त्रास सहन झाला नाही, तेव्हा तिने गाडीतून उडी टाकेन असं म्हटलं होतं, त्यानंतर तिला घरी आणलं. मी तिच्या सासूचे आणि नणंदेचे पाय धरले, माझ्या लेकराचं काय चुकलं असेल तर माफ करा म्हणून मी माफी मागितली असं, वैष्णवीच्या वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
दीड लाखांचा फोन देखील घेऊन दिला
पुढे बोलताना वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं की, मी त्यांच्या घरातील नणंदेचे, सासूचे, जावयाचे सर्वांचे पाय धरले आहेत. आम्ही आमच्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी प्रयत्न केला. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी फोन देखील मागितला. त्यांना मी दीड लाखांचा फोन देखील घेऊन दिला होता. जेव्हा ती गर्भवती होती तेव्हा तीचा आणि तिच्या नवऱ्याचा वाद झाला त्यानंतर तिने जीव द्यायचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी ती बचावली होती. वैष्णवीच्या जावेला देखील मारहाण केली जात होती. तिला नणंदेने तिच्या जावेला मारहाण केली होती. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात त्याबाबतची तक्रार दिली होती. ती अद्यापही तिच्या माहेरीच राहते, तिची केस सुरू आहे, तिला वडील नाहीत ती तिच्या आईसोबत माहेरीच राहते, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
अजित पवार लग्नाला आले होते…
वैष्णवीचे सासरे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यामुळे त्यांचा दबाव असल्याचा संशय आहे. माझी अजित पवार यांना विनंती आहे त्यांनी अटक करायला मदत करावी. वैष्णवी आणि शशांकचा लग्नाला अजित पवार देखील आले होते. ते कमीत कमी अर्धा तास लग्नामध्ये होते, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी ते आले होते. आशीर्वाद द्यायला स्टेजवर आले तेव्हा त्यावेळी त्यांनी गाडी पाहून विचारलं देखील होतं. ही गाडी आमच्या राजेंद्र हगवणे यांनी मागितली का तुम्ही दिली अशी विचारणा देखील त्यांनी केली होती. अजित पवारांनी अतिशय खोचकपणे ही गाडी त्यांनी मागितली की तुम्ही दिलेल्या असं विचारल त्यावेळी थोडी चेष्टा झाली होती.
अजित पवार आणि राजेंद्र हगवणे यांचे जवळच्या संबंध आम्ही पाहिले आहेत. हगवणे यांच्या मोठ्या सुनेचा देखील प्रकरण असंच दाबलं गेलं. त्या मुलीला वडील नाहीत.ती वैष्णवीच्या अंत्ययात्रेसाठी आली होती. तिने इथे आल्यावर आम्हाला सांगितलं. तिचा जो काही छळ सुरू होता, तिला मारहाण करून तिथून हकलून दिलेलं. त्या प्रकरणाची केस देखील अद्याप सुरू आहे. पण ती केस दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे. अजितदादांचा पाठबळ त्यांना असावं, त्यामुळेच ती केस ओपन होत नाही, असाही आमचा आरोप आहे. वेळ आली तर आम्ही अजित पवार यांना भेटू. आमची तिथपर्यंत पोहोच नाही. पण आम्ही प्रयत्न करू. तुमच्या माध्यमातून तिथपर्यंत निरोप जात असेल तर तुम्ही नक्की द्यावा, आरोपींना पकडण्यात अजितदादांनी मदत करावी. आमच्या मुलीच्या अंगावरती मारहाणीच्या इतक्या खूणा आहेत, तिने जीवन संपवलं त्या दिवशी सकाळी देखील तिला मारहाण करण्यात आली होती अशी माहिती वैष्णवीच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
अजितदादा वैष्णवीला न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा
अजित पवार आणि राजेंद्र हगवणेंचे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्यामुळंचं वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी राजेंद्र हगवणेंना अटक होत नाहीये, हेचं आम्हाला वाटतंय. पण आता अजित दादांनी त्यांच्या लाडकी बहिण वैष्णवीला न्याय मिळवून द्यावा. गरज पडल्यास आम्ही अजित दादांशी बोलण्याची तयारी कस्पटे कुटुंबियांनी दर्शवली आहे. यावेळी बोलताना वैष्णवीचे वडिल म्हणाले,
51 तोळे सोने आणि फॉर्च्युनर गाडीही आम्ही जावयाला दिली
लग्न झाल्यानंतर पाच-सहा महिन्यांनी सासरच्यांनी वैष्णवीला त्रास द्यायला सुरुवात केली. वैष्णवी दीड-दोन महिन्यांनी घरी आली की, म्हणायची पप्पा पैसे द्या. हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीला खूप टॉर्चर केले. तिला घालायचा साडी आणि ड्रेसही नसायचा. लग्नानंतर श्रावण महिन्यात गणपती-गौरी आले तेव्हा वैष्णवीच्या सासूने चांदीच्या गौरी मागितल्या. आम्ही त्या चांदीच्या गौरी त्यांना पुरवल्या. याशिवाय, लग्नात मी हगवणे कुटुंबाला चांदीची पाच ताटं दिली होती, या ताटांचे वजन साडेसात किलो इतके होते. तसेच 51 तोळे सोने आणि फॉर्च्युनर गाडीही आम्ही जावयाला दिली होती, असे वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले. अधिका महिन्यात मी जावयाला सोन्याची अंगठीही दिली होती. वैष्णवी घरी आली की काहीतरी मागायची. मी दर दीड-दोन महिन्यांनी ती घरी आली की, 50 हजार ते 1 लाख रुपये तिला द्यायचो, असेही वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले.
वैष्णवीला सासू खूप टॉर्चर करायची; वडिलांनी सगळं सांगितलं
वैष्णवी आणि तिच्या नवऱ्यात सतत खटके उडत होते. सासू तिला टॉर्चर करायची. तुला स्वयंपाक येत नाही, साफसफाई येत नाही, असे म्हणायची. आम्ही याबाबत विचारल्यावर म्हणायची, आमच्याकडे तीन बाया कामाला आहेत, तिला काय काम पडतं. मात्र, आमची पाठ वळाली की वैष्णवीला पुन्हा त्रास दिला द्यायचा. वैष्णवी घरी आल्यानंतर आम्हाला हे सगळं सांगायची. तिच्या नणंदेने दोन महिन्यांपूर्वी वैष्णवीला खूप मारलं होतं, तिच्या अंगावर थुंकली. दोघी मायलेकींनी तिला बालेवाडीपर्यंत गाडीतून टॉर्चर करत आणले. तेव्हा माझी मुलगी म्हणाली की, मी नदीत उडी टाकेन. इकडे घरी आल्यावर मी सासू, नणंद आणि जावयाचे पाय धरले. माझ्या मुलीचं चुकलं असेल तर माफ करा, असं मी म्हणालो. आम्ही मुलीचा संसार वाचवायला खूप प्रयत्न केले. दोन महिन्यांपूर्वी जावयाने माझ्याकडे दीड लाखांचा मोबाईल मागितला, तोदेखील मी दिला, असे वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले.
Comments are closed.