निमित – विद्या विटारगो विजननम स्मृति क्रिया

>> वर्षा चोपडे

भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी रमण इफेक्टचा शोध लावला होता, त्यानिमित्त दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या वर्षीच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची संकल्पना ‘विकसित भारतासाठी विज्ञान आणि नवोपक्रमात जागतिक नेतृत्वासाठी भारतीय युवकांना सक्षम करणे’ ही आहे.

विज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. आधुनिक युगाला विज्ञानाचे युग म्हणतात. विज्ञानावर एक संस्कृत श्लोक आहे, ‘विद्या वितर्को विज्ञानम् स्मृतिः तप्त क्रिया.’ याचा अर्थ असा की ज्यांच्याकडे ज्ञान, तर्क, विज्ञान, स्मरणशक्ती, तयारी आणि कार्यक्षमता आहे त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही..

भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी रमण इफेक्टचा शोध लावला होता, त्यानिमित्त दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी रमण इफेक्टचा शोध लावला आणि या शोधासाठी त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्र विषयातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय विज्ञान दिन 2025 ची थीम ‘विकसित भारतासाठी विज्ञान आणि नवोपक्रमात जागतिक नेतृत्वासाठी भारतीय युवकांना सक्षम करणे’ ही आहे.

सर चंद्रशेखर वेंकट रामण यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी तिरुचिरापल्ली, तामीळनाडू येथे झाला. त्यांनी मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून भौतिकशास्त्राचा अभ्यास केला. 1954 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निसर्गप्रेमी चंद्रशेखर सरांना विद्वान लोकांची संगत खूप आवडत असे. आपल्या भाषणात प्रा. चंद्रशेखर वेंकट रामण म्हणाले होते,“मी माझ्यासमोरच्या तरुणांना आणि महिलांना सांगू इच्छितो की त्यांनी आशा आणि धैर्य गमवायला नको. तुमच्यासमोर असलेल्या कार्यासाठी धैर्याने समर्पित राहूनच तुम्हाला यश मिळू शकते आणि या जगात घाम गाळल्याशिवाय काहीही मिळू शकत नाही. मी विरोधाभासाची भीती न बाळगता हे ठामपणे सांगू शकतो की भारतीय मनाची गुणवत्ता कोणत्याही ट्युटॉनिक, नॉर्डिक किंवा अँग्लो-सॅक्सन मनाच्या गुणवत्तेइतकीच आहे. आपल्याकडे कदाचित धैर्याची कमतरता आहे. आपल्याकडे कदाचित प्रेरक शक्तीची कमतरता आहे जी एखाद्याला पुढे घेऊन जाते. आपल्याकडे एक न्यूनगंड विकसित झाला आहे. आज भारतात पराभूत भावनेचा नाश झा पाहिजे आणि तिथे विजयाची भावना रूजवणे आवश्यक आहे. जी आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जाईल, अभिमानी संस्कृतीचे वारस म्हणून ओळख देईा. या ग्रहावर योग्य स्थान मिळविण्याचा हक्क आपल्या सगळ्यांना आहे. जर असे झो तर आपल्याला आपले भाग्य साध्य करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. सरांचे हे प्रेरणादायी भाषण प्रचंड स्फूर्ती देऊन जाते. पालक व विद्यार्थ्यांनी त्या भाषणाचा मुद्दा लक्षात ठेवणे जरुरी आहे.

आजच्या आधुनिक जगात स्पर्धा वाढली आहे. देशाची प्रगती हवी असेल तर संशोधनावर भर देणे आवश्यक आहे. तसेच सरकारने तरुण मुलांमध्ये नवीन शोध आणि नवोपक्रमांमध्ये रस निर्माण करणारे व वैज्ञानिक उत्सुकता वाढवणारे उपक्रम राबवायला हवेत. काळाची ती गरज आहे. भारतीय शास्त्रज्ञांचा विज्ञानाच्या क्षेत्रात आदर आणि सन्मान करणे, विज्ञान आणि तंत्रज्ञानात करीअर शोधण्यासाठी तरुण मुलांना प्रोत्साहित करणे, हाच राष्ट्रीय विज्ञान दिनाचा मुख्य उद्देश आहे. ज्या मुलांना हस्तकला आणि चित्रकला आवडते त्यांच्यासाठी, विज्ञान थीम असलेली कलाकृती तयार करण्यास प्रोत्साहित करणे ही एक चांगली कल्पना आहे. विज्ञान किती अद्भुत आहे हे पाहण्यासाठी मुले घरी किंवा शाळेत (प्रौढांच्या देखरेखीखाली) अनेक प्रयोग करू शकतात. विज्ञानाचा इतिहास आणि त्याशी संबंधित कथा मांना सांगितल्या पाहिजेत. या दिवशी मुलांसाठी भारतीय विज्ञानाबद्दल माहिती करून देण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण किंवा निबंध लेखन स्पर्धा आयोजित केल्या जातात. विज्ञान संग्रहालये आणि तारांगण हे वास्तविक जीवनात मुलांना विज्ञान शोध दाखवण्याचा एक संवादात्मक मार्ग आहे.

नेहरू विज्ञान केंद्र मुंबई, विज्ञान शहर गुजरात, बिर्ला औद्योगिक आणि तंत्रज्ञान संग्रहालय कोलकाता, विश्वेश्वरय्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान संग्रहालय बंगळुरू, राष्ट्रीय विज्ञान केंद्र दिल्ली… मुलांना घेऊन जाण्यासाठी ही काही प्रसिद्ध संग्रहालये आहेत. प्रदर्शने, स्पर्धा आणि कार्यशाळा यांसारख्या शाळेत विज्ञानाशी संबंधित उपक्रमांचे आयोजन करणे काळाची गरज आहे. मनोरंजक शिक्षण अनुभवण्यासाठी विज्ञान माहितीपट आणि चित्रपट मो पाहू शकतात. काही सर्वोत्तम विज्ञान चित्रपट आहेत, कॉसमॉसः अ स्पेसटाइम ओडिसी, प्लॅनेट अर्थ, बिल नाय द सायन्स गाय, अवर प्लॅनेट, द मॅजिक स्कूल बस, अपोलो 13, सायन्स ऑफ स्टुपिड… मुलांनी असे चित्रपट जरूर बघावेत. राष्ट्रीय विज्ञान दिन चार्ट किंवा पोस्टर तयार केल्याने मुलांना त्यांचे ज्ञान शिकण्यास आणि दृश्यमानपणे सादर करण्यास मदत होऊ शकते. अशा उपक्रमांमधून भावी पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल आणि विज्ञान विषयात गोडी निर्माण होईल.

[email protected]

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)

Comments are closed.