रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट देता, तुम्ही न्यायाधीश कधीपासून झालात? फडणवीसांनी माफी मागावी:


सातारा फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरण: फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या (Phaltan Doctor Death Case) प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत, तर दुसरीकडे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये याप्रकरणात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या हत्येच्या आरोपांनंतर काँग्रेस नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी याप्रकरणी धक्कादायक (Phaltan Doctor Death Case) खुलासे केले आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, डॉक्टर तरूणीवरती बलात्कार झाला. पीएसआय बदनेने केला. प्रशांत बनकरचं नाव आलं. ही आत्महत्या नाही, संस्थात्मक हत्या आहे, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. (Phaltan Doctor Death Case)

Phaltan Doctor Case: तुम्ही कोणाला वाचवत आहात?

पुढे त्या म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस नंतर तिथे फलटणला गेले आणि रणजीतसिंह निंबाळकर यांना अभय दिले. देवेंद्र फडणवीस यांना क्लीन चिट देण्याची सवय लागली आहे. माजी भाजप खासदाराला वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत. यावेळी वर्षा गायकवाड यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांसमोर सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. तुम्ही कोणाला वाचवत आहात? तुम्ही कसे न्यायाधीश झाले? तुम्हीच क्लीन चिट कशी देता? ज्या अधिकाऱ्यांनी डॉक्टर तरूणीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं, त्यांच्याकडेच चौकशीचे काम का? असे सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

Phaltan Doctor Case: देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे

वर्षा गायकवाड यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरती देखील हल्लाबोल केला आहे. त्यांनी पीडित महिलेच्या आईवडिलांशी का चर्चा केली नाही? दोन तास पोलिसांसोबत चर्चा केली. राहूल गांधींनी पिडीत तरूणीच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली. सीबीआय किंवा न्यायालयीन समितीकडून चौकशी झाली पाहिजे, देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी देखील वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

Phaltan Doctor Case: डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांशी राहुल गांधींचा फोनवरून संवाद

फलटणच्या डॉक्टर तरुणीचा आत्महत्येनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तरुणीचा कुटुंबीयांची भेट घेतली .यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाशी फोनवरून संवाद साधला .राहुल गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती कुटुंबाकडून जाणून घेतली .या घटनेत आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी पीडित कुटुंबाकडून करण्यात आली आहे.

Phaltan Doctor Case: पीडित डॉक्टरच्या वडिलांची प्रतिक्रिया…

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील कुटुंबासमवेत फोनवरून संवाद साधला. यावेळी कुटुंब मराठीत बोलत होते . राहुल गांधी हे सर्व ऐकून घेत होते. ‘तुम्हाला आता काय हवंय ? ‘ असं राहुल गांधीनी विचारताच पीडित कुटुंबांनी या प्रकरणी ‘SIT चौकशी आणि आरोपींना फाशी ‘ या दोन्ही गोष्टीची मागणी केली… यावेळी राहुल गांधींनी होकार देत तुम्ही काळजी करू नका . आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे आश्वासित केले. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा थेट दबाव पोलीस प्रशासनावर आहे त्यामुळे पोलीस चौकशी करत नाहीत असा गंभीर आरोप केलाय.

आणखी वाचा

Comments are closed.