Vasai Crime : 6 वर्षीय चिमुरड्याच्या छातीवरुन कार चालवत फरार झालेल्या चालकाला पोलिसांनी उचललं

वसई गुन्हे: वसईतील (Vasai Crime) वाळीव भागात बुधवारी (दि.26) सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले होते. एका सहा वर्षाच्या लहान मुलाच्या छातीवरून टी परमिट वाहन चालवून फरार (Vasai Accident) झालेल्या चालकाला वाळीव पोलिसांनी (Police) अटक केली आहे. कफील अहमद असे या चालकाचे नाव असून, तो गोरेगाव पूर्वेकडील राहणार आहे. अपघाताचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली होती.

वसई पूर्वेच्या शिव भिम नगर, नाईकपाडा येथे बुधवारी सकाळी 10.21 वाजता ही घटना घडली. एम.एच. 01 ई एम 3245 क्रमांकाच्या कारसाठी ओला ॲपवरून बुकिंग करण्यात आले होते. गाडी प्रवासी घेण्यासाठी येताच पाच वर्षांचा राघवकुमार चव्हाण उर्फ छोटू गाडीच्या समोर मोकळ्या जागेत मातीत खेळत होता. मात्र, कारचालकाने मुलाला पाहण्याचेही भान ठेवले नाही आणि बेदरकारपणे गाडी पुढे नेली. यामध्ये लहानग्याला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर कार चालकाचे पलायन

अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून फरार होण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने कोणतेही ऐकले नाही. ओला बुक करणाऱ्या प्रवाशालाही संपर्क साधण्यात आला, परंतु त्याने कार चालकासोबत येण्याचे सांगत मोबाईल स्विच ऑफ केला.

5 वर्षीय चिमुकल्याच्या अंगावरुन गाडी घातली अन्  फरार झाला

वसई पूर्वेच्या  शिव भिम नगर, नाईकपाडा, वाळीव  येथे आज (दि. 25) सकाळी 10.21  वाजता  मोकळ्या जागेत एम.एच. 01 ई एम 3245 या क्रमांकाची कार एका प्रवाशाने ओला ॲपवरुन बुक करुन मागवली होती. दरम्यान, कारमध्ये ड्रायव्हर आणि प्रवासी बसल्यानंतर पाच वर्षाचा राघवकुमार चव्हाण उर्फ छोटू हा गाडीच्या समोर आला आणि मातीत खेळत बसला होता. तेवढ्यात त्या कारचालकाने कार बेदराकपणे चालवत पुढे मुलगा बसलेला असल्याच न बघता त्याच्या अंगावरुन गाडी चढवली आणि फरार झाला. घटना घडल्यानंतर स्थानिक लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. माञ तो काही ही न ऐकता तेथून निघून गेला होता.

6 वर्षीय चिमुकल्याची प्रकृती गंभीर

अपघातात राघवकुमारच्या हाताला, डोक्याला, आणि छातीला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने वाळीव येथील वालवादेवी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार चालू आहे. दरम्यान, वाळीव पोलिसांनी तत्पर कारवाई करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहनचालक कफील अहमदला अटक केली आहे. सध्या पोलिस अधिक तपास करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime : बीडमध्ये गुन्हेगारांचा उच्छाद सुरूच, चक्क पोलिस चौकीसमोरच तरुणावर कोयत्याने वार

अधिक पाहा..

Comments are closed.