मोठी बातमी: वसई-विरारमध्ये मनसे अन् बविआची युती; राज ठाकरेंनी ती अट केली मान्य, नेमकं काय घडलं?

वसई-विरार महानगरपालिका BVA मनसे आघाडी: राज्यातील सर्व महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज्यातील सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याचदरम्यान वसई-विरार महापालिकेबाबत (Vasai-Virar Municipal Corporation) एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

वसई-विरारमध्ये मनसे आणि बहुजन विकास आघाडी एकत्र (BVA-MNS Alliance) निवडणुक लढवणार आहेत. येणाऱ्या निवडणुकीत मनसे आणि बविआ  यांची युती निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. मनसेच्या याठिकाणी एकही जागा नाहीत. त्यामुळे पक्ष वाढीसाठी निर्णय बहुजन विकास आघाडीसोबत युती करण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. दुसरीकडे ठाकरे गट मात्र वेगळा लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सोबत लढायचे असेल, तसेच भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाला हटवायचे असेल तर आमच्या चिन्हावर लढण्याची अट बहुजन विकास आघाडीकडून घालण्यात आली होती. बहुजन विकास आघाडीची हीच अट मान्य करुन एकत्र निवडणुक लढवण्याचा निर्णय मनसेकडून घेण्यात आला आहे.

वसई‑विरार महानगरपालिकेमध्ये 29 प्रभाग- (Vasai-Virar Municipal Corporation Election 2026)

वसई‑विरार महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांची मुदत 28 जून 2020 रोजी संपली होती. त्यानंतर निवडणुका विविध कारणांनी पुढे ढकलल्या गेल्या आणि त्यामुळे निवडलेली नगरसेवक न बसता प्रशासक शासन लागू राहिलं होतं. सध्या वसई विरार महापालिकेत 29 प्रभाग असून, 115 सदस्य संख्या आहे. यापैकी 58 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर 57 जागा पुरुषांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती (एस.सी.) आणि अनुसूचीत जमाती (एस.टी.) साठी प्रत्येकी साठी 5 आरक्षण आहेत. तर यात प्रत्येकी 2 महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहेत. तसेच 74 जागा या सर्वसाधारण प्रवर्गाकरीता राखीव ठेवण्यात आल्या आहेत

वसई-विरार महानगरपालिका निवडणूक 2015 – पक्षनिहाय निकाल (Vasai-Virar Municipal Corporation Election 2026)

एकूण जागा – 115

बहुजन विकास आघाडी (BVA) – 106 जागा

भारतीय जनता पक्ष (भाजप) – 1 जागा

काँग्रेस (INC) – 0 जागा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) – 0 जागा

शिवसेना – 5 जागा

इतर / अपक्ष – 3 जागा

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Vasai-Virar Municipal Corporation News : वसई-विरार महापालिकेत कोणाचा महापौर? बविआ की भाजपा, बदललेलं समीकरण अन् सध्याचं राजकारण, A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.