Vastu Tips : स्वयंपाकघरातील ओट्यावर पोळ्या लाटाव्या का?

जेवणाच्या ताटात येणारी गरमागरम पोळी जेवणाची चव द्विगुणित करते. पूर्वीच्या काळात, जेव्हा आजच्यासारखे मॉडर्न किचन नव्हते, तेव्हा पोळ्या या पोळपाटावर लाटून तयार केल्या जायच्या. मात्र आता स्वयंपाकघरे अशा प्रकारे बनवली जातात की त्यांच्या मॉडर्न ओट्यावरच पोळ्या लाटता येतात. खरं तर, ओटा ही खूप मोठी जागा असते आणि त्यामुळेच तिथे पोळ्या लाटणे सोपे आहे. मात्र बऱ्याच जणांना हे चुकीचे वाटते. आणि ते तसे करण्यास नकार देतात. पण बऱ्याच लोकांना स्वयंपाकघरातील ओट्यावर पोळ्या लाटण्यात कोणतीही अडचण वाटत नाही. वास्तुशास्त्रानुसार, घरात स्वयंपाकघराचे विशेष स्थान आहे. एका विचारानुसार, तुम्ही जे अन्न खाता ते तुमची मानसिक स्थिती ठरवत असते. याचा सरळ अर्थ असा की जेव्हा तुम्ही योग्य दिशेने बनवलेल्या स्वच्छ आणि शुद्ध स्वयंपाकघरात अन्न शिजवता तेव्हा त्याची चव तर सुधारतेच, शिवाय त्याची सकारात्मक ऊर्जा तुम्हाला निरोगी देखील बनवते.

ओटा स्वच्छ असावा

हल्लीच्या काळात मॉडर्न किचन्समुळे स्लॅबवरच अर्थात ओट्यावरच पोळ्या लाटल्या जातात. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे ओटा स्वच्छ आणि व्यवस्थित बांधलेला असावा. किचनमध्ये शुद्धता आणि सकारात्मकता राखण्यासाठी, ओटा हा केवळ अन्न शिजवण्यासाठी वापरला गेला पाहिजे.

स्वयंपाकाची जागा पूर्वेकडे तोंड करून असावी, जेणेकरून सूर्याची सकारात्मक ऊर्जा स्वयंपाक तयार करताना आपल्या किचनमध्ये येते. जर तुमच्या किचनमधील ओटा खिडकीजवळ असेल, तर तिथे पोळ्या लाटता येऊ शकतात. जर किचन उत्तरेकडे असेल तर सूर्यप्रकाश तिथे पोहोचत नाही. त्यामुळे जर ओलावा आणि घाण असेल तर तिथे बॅक्टेरिया वाढू शकतात. लाकडी पाट्या म्हणजेच पोळपाट आणि लाटणे हे देखील राहू आणि केतूशी संबंधित आहेत. असे म्हटले जाते की त्यावर पोळ्या लाटल्याने राहू आणि केतूशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत.

शास्त्र काय सांगते?

वास्तु शास्त्राव्यतिरिक्त, विज्ञान असेही म्हणते की अन्न स्वच्छ आणि आरोग्यदायी पद्धतीने तयार केले पाहिजे. स्वयंपाकघरातील स्लॅबवर जंतू आणि बॅक्टेरिया असू शकतात. विशेषतः जेव्हा ते नियमितपणे स्वच्छ केले जात नाही.
तसेच, तुमच्या अनुपस्थितीत, झुरळे, पाली इत्यादी तिथून गेले असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे रोग पसरू शकतात. म्हणून, पोळ्या थेट स्लॅबवर लाटणे नेहमीच स्वच्छ नसते. याव्यतिरिक्त, पृष्ठभागावर इतर अन्नपदार्थांचे अवशेष, स्वयंपाकातून सांडलेले पदार्थ किंवा धूळ असू शकते.

पोळी लाटताना ती ओट्याला चिकटण्याची शक्यता असते आणि त्यामुळे देखील आरोग्याला धोका वाढतो. म्हणून, लाकडी फळी किंवा स्वच्छ काउंटरटॉपसारख्या स्वच्छ पोळपाटावर पोळी लाटल्याने स्वच्छता राखण्यास मदत होऊ शकते.

हेही वाचा : Refrigerator : उन्हाळ्यात फ्रीजमध्ये ठेऊ नयेत या वस्तू


संपादित – तनवी गुडे

Comments are closed.