Vat Savitri Vrat 2025 : वट सावित्री व्रताची अशी करा तयारी

हिंदू धर्मात वट सावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे. पंचागानुसार, जेष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. यंदा वटपौर्णिमा 10 जून 2025 रोजी साजरी होणार आहे. या दिवशी विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करून प्रार्थना करतात. मान्यतेनुसार, जी विवाहित स्त्री हे व्रत पूर्ण करते तिला अखंड सौभाग्य प्राप्त होते, असे सांगितले जाते. या दिवशी सावित्रीने तिच्या पतीने सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते. त्यामुळे महिला आपलं सौभाग्य आणि आनंदमय वैवाहिक जीवनासाठी वटपौर्णिमेला वडाची पूजा करतात. अशातच पूजा करतानापहिल्यांदाच वट सावित्री पूजा करणाऱ्या अनेक महिलांचा साहित्याबाबत अनेकदा गोंधळ होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वट सावित्रीच्या व्रतासाठी लागणारे साहित्य याबद्दल माहिती देत आहोत,जेणेकरून वट सावित्री व्रताची तयारी तुमची झटपट होईल.

धार्मिक मान्यतेनुसार, या व्रताची पूजा सकाळपासूनच सुरू होते. त्यामुळे वट सावित्री व्रताचे पूजा साहित्य व्रताच्या एक दिवस आधी आणणे सोयीचे जाईल.

साहित्य –

  • पांढरे सूत
  • आंबा, टरबूज यासांरखी हंगामी फळे
  • फुले
  • वटवृक्षाची फांदी
  • अक्षता
  • धूप लाठी
  • भिजवलेले हरभरे
  • कुंकू,
  • चंदन
  • दिवा
  • सुगंधी अत्तर
  • बटाशा
  • सुपारी
  • ओटीसाठी नारळ
  • साखर किंवा गुळ
  • पाणी

पुजा करण्याची पद्धत –

वट सावित्री व्रताची पूजा पद्धत फार सोपी आहे. विवाहित महिला ब्रम्ह मुहूर्तावर स्नान करून लाल किंवा पिवळ वस्त्र घालतात. साजश्रृंगारही केला जातो. वडाच्या झाडाच्या मुळाशी पाणी, कच्चे दूध, गंगाजर अर्पण केले जाते. पूजेमध्ये झाडाला तांदूळ, फुले, फळे, धूप, दिवे, हरभरे, गूळ, अर्पण केली जातात. यानंतर वडाला कच्चा दोऱ्याने 7 ते 108 वेळा प्रदक्षिणा घातल्या जातात. वटसावित्री कथा वाचली जाते. दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. संपूर्ण विधी श्रद्धेने आणि भक्तीने केला जातो.

https://www.youtube.com/watch?v=wqtj2uqfwbg

Comments are closed.