एक हजार मूर्तिकारांना विनामूल्य जागा, पालिकेकडून 910 टन मोफत शाडू मातीचेही वाटप

मुंबईत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी पालिकेने पुढाकार घेतला असून आतापर्यंत तब्बल 993 मूर्तिकारांना विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय 910 टन मोफत शाडू मातीचेही वाटप करण्यात आले आहे.

ज्या मूर्तिकारांना आणखी शाडू माती हवी असेल, त्यांनी महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.mcgm.gov.in वर ‘नागरिकांकरिता’ आणि ‘अर्ज करा’ या रकान्यात ‘मंडप (सार्वजनिक गणेशोत्सव/नवरात्रोत्सव/इतर उत्सव)’ या सदरामध्ये मागणी नोंदवावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने उपआयुक्त तथा श्री गणेशोत्सवाचे समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.

असे होतेय काम

– प्रत्येक परिमंडळात 100 टनांसोबत आवश्यक तेवढी शाडू माती मूर्तिकारांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण 910 टन इतकी शाडू माती मोफत देण्यात आली आहे.
– पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱया मूर्तिकारांसाठी महानगरपालिकेच्या उपलब्ध असलेल्या जागेनुसार ‘प्रथम अर्जदारास प्राधान्य’ या तत्त्वावर आवश्यक ती जागादेखील विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Comments are closed.