संजय शिरसाटांनी पैसे न भरल्याने वेदांत हॉटेलचा लिलाव रद्द

छत्रपती संभाजीनगर येथील विट्स म्हणजेच वेदांत हॉटेलची लिलाव प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आली आहे. मिंधे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी मुलगा सिद्धांत याच्यासाठी वेदांत हॉटेल 67 कोटी रुपयांना खरेदी करण्याचे ठरवले होते, परंतु लिलाव प्रक्रियाच बेकायदा असल्याचे शिवसेनेने समोर आणल्याने शिरसाट वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकसारख्या मोक्याच्या ठिकाणी हे आलिशान विट्स हॉटेल आहे. सिद्धांत शिरसाट याची कोणतीही उद्योजक पार्श्वभूमी नसताना त्याने हे हॉटेल विकत घेण्यासाठी 67 कोटी रुपये आणले कुठून? असा सवाल शिवसेनरा नेते-खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. हे हॉटेल खरेदी करणाऱ्यांनी 25 टक्के रक्कम लिलावाच्या एक महिन्यात आणि 75 टक्के रक्कम लिलावानंतर तीन महिन्यांत देणे बंधनकारक होते अन्यथा अनामत रक्कम जप्त करण्यात येईल, असा नियम होता.

Comments are closed.