काळजाचा तुकडा वाचवण्यासाठी ‘ती’ ढाल बनली; भूकंपात मुलीला कुशीत धरत आईने प्राण सोडले… फुटबॉलपटूच्या पत्नीचा करूण अंत
दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएला एकामागोमाग दोन शक्तिशाली भूकंपाने हादरला आहे. या भूकंपामध्ये आतापर्यंत 1400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत असताना एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. व्हेनेझुएलाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू हेक्टर बेलो याच्या पत्नीने आपल्या अवघ्या एक वर्षाच्या चिमुरडीला मृत्यूच्या जबड्यातून वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे.
मारिटिमो डी ला ग्वायरा या क्लबसाठी खेळणारा फुटबॉलपटू हेक्टर बेलो याने इंस्टाग्रामवर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करत ही दुःखद माहिती दिली. बुधवार 24 जून रोजी झालेल्या लागोपाठच्या दोन भयानक भूकंपांमध्ये त्याची पत्नी अँड्रिया बेलो हिचा मृत्यू झाला. मात्र, मृत्यूच्या दाढेत असतानाही तिने एक वर्षाची मुलगी अलाना हिच्यासाठी स्वतःची ढाल केली आणि तिला जीवदान दिले. ‘इंडिया टुडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
Comments are closed.