हुकूमशाहीविरोधात लढणाऱ्या लोकशाहीवादी मारिया मचाडो

व्हेनेझुएलाच्या ‘आयर्न लेडी’ अशी मारिया कोरिना मचाडो  यांची ओळख आहे. लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी व्हेनेझुएलामध्ये अथक प्रयत्न केले आहेत. जागतिक शांतता, मानवी हक्क आणि संघर्ष थांबवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱया व्यक्ती किंवा संस्थांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी यंदा व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांची निवड झाली आहे.  हुकूमशाहीविरोधात लढणाऱया लोकशाहीवादी मारिया मचाडो अशी त्यांची ओळख आहे. मारिया मचाडो या व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या आहेत. या पुरस्कारासोबत त्यांना सुमारे सात कोटी रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.

मारिया कोरिना मचाडो पेरिस्का यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1967 रोजी झाला होता. 2011 ते 2014 पर्यंत व्हेनेझुएलाच्या राष्ट्रीय सभेच्या निर्वाचित सदस्य म्हणून त्यांनी काम केले.  वर्ष 2024 च्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक त्यांनू लढवली होती, परंतु सरकारने त्यांची   उमेदवारी रद्द केली होती. त्यानंतर मचाडो यांनी एडमंडो गोंजालेज उरूतिया पार्टीचे प्रतिनिधत्व केले होते.

मचाडो यांनी ‘सुमाते’ ही संघटना स्थापन केली, जी लोकशाही सुधारण्यासाठी काम करते. व्हेनेझुएलाच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांच्या भाषणात व्यत्यय आणून मचाडो पहिल्यांदा चर्चेत आल्या. ही घटना 14 जानेवारी 2012 रोजी घडली. चावेझ यांनी संसदेत 9 तास 45 मिनिटे भाषण दिले होते तेव्हा मचाडो त्यांच्यावर ओरडल्या होत्या. मारिया यांनी व्हेंटे व्हेनेझुएला राजकीय पक्षाची स्थापना केली. अलेजांद्रो प्लास यांना राष्ट्रीय समन्वयक म्हणून त्यांनी नियुक्त केले. 2018 मध्ये मचाडो यांना ‘बीबीसी’च्या 100 महिलांमध्ये समाविष्ट करण्यात आले. 2025 मध्ये ‘टाइम’ मासिकाने मचाडो यांना जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींपैकी एक म्हणून घोषित केले होते.

मारिया कोरिना मचाडो यांना देशात लोकशाही पुनर्स्थापनेसाठी आणि राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या हुकूमशाही प्रशासनाविरुद्धच्या संघर्षासाठी ओळखले जाते. मारिया कोरिना मचाडो यांनी दीर्घकाळ नागरिक स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी, स्वातंत्र्य आणि निष्पक्ष निवडणुका होण्याची मागणी करण्यासाठी आणि त्यांच्या देशातील सत्तावादी पद्धतींना विरोध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

काय म्हटले नोबेल समितीने…

नोबेल समितीने म्हटले, की व्हेनेज्युएला हा आधी अपेक्षाप्रमाणे लोकशाही आणि समृद्ध देश होता. आता एक निर्दयी हुकूमशाहीत  बदलला आहे, जो मानवी आणि आर्थिक संकटांना सामोरे जात आहे. आज बहुतेक व्हेनेज्युलाचे नागरिक भयंकर गरीबीमध्ये जगत आहेत. मात्र, दुसरीकडे काही लोक सत्तापिपासू लोक देशाची मालमत्ता लूटत आहेत. सुमारे 80 लाख लोक देश सोडून गेले आहेत, आणि विरोधकांना धमक्या आणि पैद करणे, त्यांना तुरुंगात डांबून त्यांच्यावर दडपशाही करत आहे.

Comments are closed.