ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची १०१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची महत्त्वाची सभा बुधवार, १८ मार्च २०२६ रोजी पार पडली. या सभेत नियोजित १०१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. नाट्य परिषदेच्या या निर्णयामुळे रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एका दिग्गज व्यक्तिमत्त्वाचा सन्मान झाला असून नाट्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

१०० व्या नाट्यमहोत्सवाचा रत्नागिरीत समारोप

याच बैठकीत ऐतिहासिक अशा १०० व्या नाट्यमहोत्सवाच्या सांगता समारंभाची घोषणाही करण्यात आली आहे. या शताब्दी महोत्सवाचा दिमाखदार सांगता सोहळा शुक्रवार, २४ एप्रिल ते रविवार, २६ एप्रिल २०२६ या कालावधीत रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे. कोकणच्या भूमीत होणाऱ्या या तीन दिवसीय सोहळ्यात दिग्गज कलाकार आणि नाट्यकर्मींची उपस्थिती असणार आहे.

मोहन जोशी यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांत आपला ठसा उमटवला आहे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी यापूर्वी कार्यभार सांभाळला असून, आता नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान त्यांना मिळाला आहे.

Comments are closed.