बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र अत्यवस्थ

बॉलीवूडचे ही-मॅन अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक असून ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. डॉक्टरांची विशेष टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेऊन आहे.
89 वर्षीय अभिनेते धर्मेंद्र यांना वयोमानानुसार प्रकृतीसंबंधी काही तक्रारी जाणवत असल्यामुळे त्यांना 31 ऑक्टोबरला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमधून व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आले. धर्मेंद्र यांचे कुटुंबीय रुग्णालयात उपस्थित असून त्यांच्या मुलीदेखील अमेरिकेहून रवाना झाल्या आहेत.
दरम्यान, हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिली आहे. धर्मेंद्र यांच्या तब्येतीची काळजी करणाऱया सर्वांचे मी आभार मानते. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा, अशी पोस्ट हेमा मालिनी यांनी केली.

Comments are closed.