ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन, मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा

मराठी मालिका आणि सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विवेक लागून यांचं गुरुवारी सायंकाळी दुःखद निधन झालं. त्यांच्यावर उद्या सकाळी 11 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. लागू यांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळले नाही. विवेक लागू हे दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे पती होतं. तर अभिनेत्री मृणाल लागू हिचे ते वडील आहेत. विवेक लागू यांनी अनेक मराठी मालिका आणि सिनेमात अभिनय केला आहे.

Comments are closed.