VHT 2025-26: 1 धाव काढताच विराट कोहली गाठणार मोठा टप्पा; सचिननंतर हा पराक्रम करणारा दुसरा खेळाडू
विजय हजारे ट्रॉफीला आज 24 डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेत विराट कोहली, रोहित शर्मा आणि रिषभ पंतसारखे खेळाडू खेळताना दिसतील. 15 वर्षांनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट कोहली दिल्लीकडून खेळताना दिसेल. या स्पर्धेत दिल्लीचा पहिला सामना आंध्रविरुद्ध होणार आहे. हा सामना 24 डिसेंबर रोजी बेंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळला जाईल. या सामन्यामुळे विराट कोहलीला मोठी कामगिरी करण्याची संधी मिळेल.
लिस्ट ए क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 538 डावांमध्ये 219999 धावा केल्या आहेत. दरम्यान, विराट कोहलीने 329 डावांमध्ये 15999 धावा केल्या आहेत आणि या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. आंध्रविरुद्धच्या सामन्यातील एका धावेसह तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये 16000 धावा पूर्ण करेल. सचिन तेंडुलकरनंतर लिस्ट ए क्रिकेटमध्ये भारतासाठी 16000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो दुसरा खेळाडू ठरेल. यादीत तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे, ज्याने 338 डावांमध्ये 13578 धावा केल्या आहेत. 421 डावांमध्ये 15622 धावा करणारा सौरव गांगुली चौथ्या क्रमांकावर आहे.
लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
सचिन तेंडुलकर – 21,999 धावा (538 डाव)
विराट कोहली – 15,999 धावा (329 डाव)
सौरव गांगुली – 15,622 धावा (421 डाव)
रोहित शर्मा – 13,758 धावा (338 डाव)
शिखर धवन – 12,074 धावा (298 डाव)
विराट कोहलीचा दिल्लीच्या विजय हजारे ट्रॉफी संघात समावेश करण्यात आला आहे, ज्याचे सामने बेंगळुरू आणि अलूर येथे खेळवले जातील. विराट कोहली बेंगळुरूमध्ये होणाऱ्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळताना दिसेल. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 329 डावांमध्ये 57.34 च्या सरासरीने 15999 धावा केल्या आहेत. या काळात विराट कोहलीने 57 शतके आणि 84 अर्धशतके केली आहेत. अलिकडेच, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये विराटने जबरदस्त फॉर्म दाखवला, तीन सामन्यांमध्ये 151 च्या सरासरीने 302 धावा केल्या, ज्यामध्ये सलग दोन शतके आणि एक अर्धशतक समाविष्ट आहे. अशाप्रकारे, त्याची उपस्थिती दिल्लीला खूप मजबूत बनवते.
Comments are closed.