व्हियान मुलडर त्रिशाकसमीप

विआन मुल्डरच्या 264 धावांच्या अभेद्य आणि झंझावाती खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवशी 4 बाद 465 धावा फटकावल्या. मुल्डरने डेव्हिड बेडिंगहॅमसह (82) तिसऱ्या विकेटसाठी 184 तर हुआन द्रे प्रेटोरियसह (78) चौथ्या विकेटसाठी 217 धावांची भागी रचल्यामुळे त्यांना 465 धावा चोपून काढता आल्या. मुल्डरने आपल्या 259 चेंडूंच्या खेळीत 34 चौकार आणि 3 षटकार लगावले. त्याला आपल्या खेळीत आणखी 36 धावांची भर घालून त्रिशतक साजरे करण्याची ऐतिहासिक संधी आहे.

Comments are closed.