आज उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक; सी.पी राधाकृष्णन, बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत, मतांचं गणित
उपाध्यक्ष निवडणूक 2025: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Vice President Election 2025) आज (9 सप्टेंबर) मतदान होत आहे. सकाळी 10 वाजता मतदानाला सुरूवात होईल. एनडीएच्या वतीनं सी.पी राधाकृष्णन (CP Radhakrishnan) तर इंडिया आघाडीच्या वतीनं निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी (B Sudershan Reddy) रिंगणात आहेत. बहुमत असूनही भाजपने या निवडणुकीत सावध पवित्रा घेतलाय. उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीए उमेदवाराचा विजय निश्चित आहे परंतु एकही मत नाकारले जाणार नाही याची काळजी घ्या, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांच्या कार्यशाळेदरम्यान केल्याची माहिती सूत्रांनी माझाला दिलीये. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी निवड मंडळात 781 सदस्य असतात, त्यापैकी 542 लोकसभेचे आणि 239 राज्यसभेचे असतात. उपराष्ट्रपती निवडण्यासाठी बहुमताचा आकडा 391 आहे.
देशाला लवकरच उपराष्ट्रपती लाभणार आहे. आज होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडी दोन्ही गटाची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. सकाळी 10 वाजता मतदानाला सुरूवात होईल संध्याकाळी उशिरापर्यंत निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. एनडीएच्या वतीनं सी.पी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीच्या वतीनं निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आलीय. मात्र रेड्डी यांना निवडणुकीआधीच मोठा झटका बसलाय. बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समितीचे 4 राज्यसभा खासदार आणि बीजेडीचे 7 खासदारांनी मतदानाला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे इंडिया आघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत काय होतंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
उपाध्यक्षपदाची निवडणूक | बीआरएस, बीजेडी आणि शिरोमणी अकाली दल यांनी निवडणुकीत मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
आज उपाध्यक्षपदाची निवडणूक आयोजित केली जाईल. एनडीएचे उमेदवार आणि महाराष्ट्रचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना विरोधी भारत ब्लॉकच्या उमेदवाराचा सामना करावा लागला आहे आणि… pic.twitter.com/eguyekvii5
– वर्षे (@अनी) 9 सप्टेंबर, 2025
उपराष्ट्रपतीपदाचं गणित काय?
एनडीएचे दोन्ही सभागृहात एकूण 425 खासदार आहेत. यासोबतच, वायएसएआरनेही एनडीएचे उमेदवार सी.पी राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला आहे. आता एनडीएकडे 436 खासदारांची मते असतील. जर आपण आकडेवारी पाहिली तर एनडीएच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे. दुसरीकडे, जर आपण विरोधी उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांच्याबद्दल बोललो तर त्यांच्याकडे फक्त 324 मते आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी 112 मतांचा फरक आहे. याशिवाय, सात खासदार अपक्ष आहेत, ज्यांनी अद्याप कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. झेडपीएम, अकाली दल आणि आम आदमी पक्षाच्या स्वाती मालीवाल यांची भूमिका देखील स्पष्ट नाही. विरोधी उमेदवाराच्या बाजूने काही क्रॉस व्होटिंग झाले तरी विजयापासून दूर राहण्याची शक्यता आहे.
https://www.youtube.com/watch?v=Q4qbd9ka3dy
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.