संघ हरणार असेल, तर माझ्या शतकांना काही अर्थ नाही! – रोहित शर्मा

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावासमोर आता अजून एक ट्रॉफी आहे त्याने टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर अजून एक किताब जिंकलेला आहे. पण या दोन्ही स्पर्धेत धावांच्या बाबतीत रोहित थोडासा मागे होता. रोहितच्या विकेटवर प्रत्येकाचं म्हणणं असायचं की, एवढी घाई का करतोस? थोडा वेळ अजून खेळला असतास पण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहितने या सर्व प्रश्नांवर उत्तर दिले आहे, काय ते जाणून घेऊया.

रोहित शर्माने टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर स्टार स्पोर्ट्सला इंटरव्यू देताना म्हटले की, 2019 च्या वर्ल्ड आठवला तर टीम इंडियाला तेव्हा मोठा झटका बसला होता. भारतीय संघ उपांत्यफेरी सामन्यात न्युझीलंड कडून पराभूत झाल्यामुळे तेव्हा तो जिंकू शकला नाही. या स्पर्धेत रोहित शर्मा प्रभावी कामगिरी करताना दिसला. त्यावेळी रोहित शर्माने उपांत्य फेरी सामन्यापर्यंत एक दोन नाही तर 5 शतकं झळकावली होती. तरीही भारतीय संघ ट्रॉफी जिंकू शकला नाही. त्यानंतर रोहित शर्माने पूर्णपणे त्याचे खेळातील प्रदर्शन बदलले आणि तो त्यानंतर संघासाठीच खेळत राहिला आहे.

रोहित शर्मा म्हणाला तुम्ही पाहिलं की 2019 वर्ल्ड कप मध्ये आम्ही खूप चांगलं खेळलो. मी जरी 5 शतक केली तरीही टीम इंडिया जिंकू शकली नाही. आम्ही ज्या साठी खेळत होतो ते लक्ष आम्हाला मिळालंच नाही. तर मग माझ्या 5 शतकांचा काय फायदा? माझी 5 शतक वाया गेली. जेव्हा संघ ट्रॉफी जिंकू शकला नाही. त्यानंतर माझ्यासाठी माझ्या खेळण्यापेक्षा संघ विजयी होणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं.

रोहित शर्मा ने 2023 च्या वर्ल्ड कप पराभवावर भाष्य केले. तो म्हणाला 2023 च्या वर्ल्ड कप आधीच आम्ही निर्णय घेतला होता की, संघ रेकॉर्डच्या मागे धावणार नाही. रेकॉर्ड आज आहे, उद्या राहील, त्यानंतर कुणाला आठवणीत राहणार नाही. जर संघामध्ये ट्रॉफी नसेल तर या सगळ्याला काय अर्थ आहे? ट्रॉफी आणि स्पर्धा कायम लक्षात ठेवली जाते. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला होता आणि माझ्या या निर्णयाला संघातील सर्व खेळाडूंनी साथ दिली. जर संघ साथ देत नसेल तर तुम्ही हे करू शकत नाही.

हेही वाचा

अंतिम सामन्यानंतर भारतीय संघावरती प्रशिक्षकाने केला कौतुकांचा वर्षाव!

क्रिकेटर की डान्सर? श्रेयस अय्यरच्या भन्नाट स्टेप्सवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस!

क्रिकेटर की डान्सर? श्रेयस अय्यरच्या भन्नाट स्टेप्सवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस!

Comments are closed.