कर्नाटकला धूळ चारत विदर्भची फायनलमध्ये दमदार एंट्री, विजय हजारे ट्रॉफीत प्रथमच इतिहास रचला

विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या सेमीफाइनलमध्ये विदर्भने कर्नाटकला 7 विकेट्सने पराभूत करत फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले. हा विजय विदर्भसाठी खास ठरला कारण स्पर्धेच्या इतिहासात कर्नाटकविरुद्ध हा त्यांचा पहिला विजय होता. मागील वर्षी अंतिम फेरीत कर्नाटकने विदर्भवर विजय मिळवून खिताब जिंकला होता, मात्र या वर्षी उलटफेर झाला.

या हायवोल्टेज सामन्यात कर्नाटकने प्रथम फलंदाजी केली आणि 49.4 षटकामध्ये सर्व विकेट्स गमावून 280 धावा केल्या. सुरुवातीला दोन्ही सलामीवीर मयंक अग्रवाल (9) आणि देवदत्त पडिक्कल (4) लवकर आउट झाले. ध्रुव प्रभाकर आणि करूण नायरने तिसऱ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली, मात्र 17व्या षटकांमध्ये दर्शन नालकंडेने प्रभाकरला बाद करत ही जोडी तोडली. त्यानंतर कृष्णन श्रीजीत आणि करूण नायरने 113 धावांची मजबूत भागीदारी करत संघाला सम्मानजनक स्कोअरकडे नेले.

कर्नाटकसाठी करूण नायरने 90 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 1 षटकार खेचत 76 धावा केल्या. कृष्णन श्रीजीतने 53 चेंडूंमध्ये 7 चौकार ठोकून 54 धावा जोडल्या. त्याशिवाय श्रेयस गोपाल (36), अभिनव मनोहर (26) आणि विद्याधर पाटिल (1) फलंदाजीवर टिकू शकले नाहीत. दर्शन नालकंडेने 10 षटकांमध्ये 48 धावा देत 5 विकेट्स घेत कर्नाटकला मोठा झटका दिला. यश ठाकुरने दोन विकेट्स मिळवून विजय मिळवण्यासाठी योगदान दिले.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या विदर्भची सुरुवात थोडी खराब झाली, चौथ्या षटकात अर्थव तायडे (6) बाद झाला. परंतु अमन मोखाडे आणि ध्रुव शौरीने दुसऱ्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली. 24व्या षटकामध्ये ध्रुव शौरी (47) बाद झाला. त्यानंतर मोखाडे आणि रविकुमार समर्थने तिसऱ्या विकेटसाठी 147 धावांची जबरदस्त भागीदारी केली. मोखाडेने 122 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 135 धावांची शानदार खेळी खेळली.

विदर्भने 46.2 षटकामध्ये 4 विकेट्स गमावत 284 धावा करून सामना 7 विकेट्सने जिंकला. रविकुमार समर्थ नाबाद 76 धावा करून विजयात महत्वाची भूमिका बजावली.

Comments are closed.