Video – भाजपच्या व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीचा खोटा प्रचार रोखा, आदित्य ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन
‘निवडणूक जाहीर होताच व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीवर भाजपने खोटा प्रचार सुरू केला आहे. शिवसेनेची कामे ते स्वतःच्या नावावर खपवत आहेत. अशा वेळी खरी परिस्थिती आणि शिवसेनेचे काम लोकांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी सज्ज व्हा. डिजिटल माध्यमांवरचा भाजपचा खोटा प्रचार पुसून काढा. त्यांना तिथल्या तिथे उत्तर द्या,’ असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

Comments are closed.