ट्रेंड – पावसात लहानगीने धरला ठेका
पावसाच्या पाण्यात भिजणे, उड्या मारणे लहान मुलांना आवडते. या खेळण्या-बागडण्यातूनच बालपण खऱ्या अर्थाने जगता येते. अशाच एका लहानगीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलीने शाळेचा गणवेश घातला असून पावसाचा आनंद घेत नाचतेय. मुसळधार पावसातही तिचा अल्लडपणा कायम आहे. ‘बरसो रे मेघा’ या गाण्यावर नाचताना ती पावसाचे स्वागत करतेय. अनेकांनी ‘खरे बालपण म्हणजे असेच मनमोकळेपणाने जगणे,’ अशी कमेंट्स केली आहे. सोशल मीडियावर अनेक जणांनी मुलीचे कौतुक केले आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ms_guru_harshikha2 या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
Comments are closed.