विधान भवन हाणामारी, नितीन देशमुख, सर्जेराव टकले न्यायालयीन कोठडीत; आणखी तीन आरोपींचा शोध सुरू

विधान भवन परिसरात हाणामारी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नितीन देशमुख व सर्जेराव टकलेला सोमवारी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
देशमुख व टकले यांच्यामार्फत हाणामारीतील अन्य आरोपींची ओळख पटवायची आहे. हे दोघे तपासात सहकार्य करत नाहीत. त्यामुळे या दोघांच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करावी, अशी मागणी आझाद मैदान पोलिसांनी केली. तसेच देशमुख यांचा एक सहकारी व टकलेच्या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत, असे देशमुख यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

जामिनासाठी अर्ज

देशमुख व टकलेने जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जांवर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे.

काय आहे प्रकरण…

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधान भवन परिसरात तुफान हाणामारी झाली. आझाद मैदान पोलिसांत याचा गुन्हा नोंदवण्यात आला. देशमुख व टकलेला अटक झाली. विधान भवनात येण्यासाठी लागणारा आवश्यक पास देशमुखला कसा मिळाला व टकले विनापासचा येथे कसा आला याचा शोध पोलीस घेत आहेत.

Comments are closed.