भाजप 11 पैकी 11, शिवसेना 4 पैकी 3, राष्ट्रवादीने 2 पैकी 2 जागा जिंकल्या…; विधान परिषदेचा संपू
विधान परिषद निवडणूक निकाल 2026 विजेत्या उमेदवारांची यादी: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election Result 2026) महायुतीचा बोलबाला राहिला. तर महाविकास आघाडीची पिछेहाट पाहायला मिळाली. राज्यातील 17 पैकी 16 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर अपक्ष आणि भाजप बंडखोराचा विजय झाला. भाजप, 11, शिवसेना 3, राष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि अपक्ष 1 असा विधान परिषदेचा निकाल लागला आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी निवडणूक पार पडली होती. मात्र या निवडणुकीआधीच 17 पैकी 6 ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते. त्यामुळे आज उरलेल्या 11 जागांचा निकाल समोर आला. (Vidhan Parishad Election Result 2026 Winner Candidate List)
17 जागांसाठी भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 असा महायुतीचा फॉर्म्युला ठरला होता. त्यानूसार भाजपने 11, शिवसेनेने 4 आमि राष्ट्रवादी काँग्रेसने 2 जागांवर निवडणूक लढवली. यापैकी भाजपने 11 पैकी 11 जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने 2 पैकी 2 जागा जिंकल्या. तर शिवसेनेने 4 पैकी 3 जागा जिंकल्या. नाशिकची जागा महायुतीमधील शिवसेनेला सुटली होती. परंतु गोकुळ गीते यांनी बंडखोरी केली आणि त्याचाच फटका शिवसेनेला बसला. नाशिकमधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अपक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी पराभव केला. (Vidhan Parishad Election Result 2026 Winner Candidate List)
नाशिकमध्ये चक्रावणारा निकाल- (Nashik Vidhan Parishad Election Result 2026)
विधान परिषदेच्या 17 जागांवर झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत ठरला तो नाशिक मतदारसंघ…नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेल्या शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पराभवाची धूळ चारली.. महायुतीत नाशिकची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली होती.. तिथे नरेंद्र दराडेंना उमेदवारी मिळाली. मात्र, तिथे गिरीश महाजन समर्थक आणि भाजपचे नेते गणेश गीते यांच्यासह त्यांचे बंधू गोकुळ गीतेंनी अर्ज भरून बंडखोरी केली. त्यामध्ये गणेश गीतेंनी मुदतीच्या आधीच अर्ज मागे घेतला. मात्र, त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी मुदत संपली तरी अर्ज मागे घेतला नाही. या गोकुळ गीतेंची समजूत काढण्यासाठी गिरीश महाजन, उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून राहिले. चर्चेच्या डझनभरापेक्षा जास्त फेऱ्या झाल्यानंतर मतदानाच्या काही दिवस आधी गोकुळ गीतेंनी प्रचार थांबवत असल्याचं जाहीरही केलं. पण अर्ज मागे न घेतल्यानं त्यांचं नाव मतपत्रिकेत कायम होतं. त्यांनी त्यांची छुपी रणनीती सुरूच ठेवत या निवडणुकीत विजय मिळवलाय. गोकुळ गींतेच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत एकच जल्लोष केला.
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालांचे सर्व अपडेट्स, VIDEO:
संबंधित बातमी:
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Comments are closed.