मी तुझी फॅन नाही का? लग्नाला न बोलावल्याने चिमुकली झाली नाराज; व्हिडीओ व्हायरल होताच विजय देवरकोंडानं केली मोठी कमिटमेंट!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दक्षिणेकडील सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना हे जोडपे 26 फेब्रुवारी रोजी विवाह बंधनात अडकले. राजस्थानमधील उदयपूर येथे हा शाही लग्न सोहळा आयोजित करणअयात आला होता. या लग्नसोहळ्याला कुटुंबातील सदस्य आणि विजय-रश्मिका यांचे जवळचे मित्र उपस्थित होते. मात्र या लग्नाला आपल्याला बोलावले नाही म्हणून विजय-रश्मिकाची एक चिमुकली चाहती चांगलीच नाराज झाली आहे. व्हिडीओ बनवत तिने आपली नाराजी व्यक्त केली.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा विवाहसोहळा पार पडल्यानंतर सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल झाला. यात तिने आपल्याला लग्नाला का बोलावले नाही? असा सवाल केला आहे. मला लग्नाला का बोलावले नाही? मी तुझी फॅन नाही का? असा निरागस प्रश्न चिमुकलीने विचारला. यानंतर हा व्हिडीओ एवढा व्हायरल झाला की थेट विजय देवरकोंडापर्यंत पोहोचला. त्याने या व्हिडीओवर खास कमेंट केली आहे.

बुज्जीथल्ली (लाडक्या बाळा)… मी तुला जेवायला घरी बोलावणार आहे. तुझे आवडते पदार्थ आणि मिठाई मला सांग, मी घरी सर्व काही बनवायला सांगतो आणि आपण मस्त जेवूया, अशी कमेंट विजय देवरकोंडा याने केली आहे. विजयच्या या प्रेमळ आमंत्रणाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. विजयने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे.

दरम्यान, लग्नानंतर या नवविवाहित जोडप्याने आपल्या चाहत्यांसाठी एक खास संदेशही शेअर केला आणि देशभरात आनंद साजरा केला. या जोडप्याने दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये चाहत्यांना मिठाई वाटली. तसेच कर्नाटक, आसाम, राजस्थान आणि आंध्र प्रदेशमधील अनेक मंदिरांमध्ये अन्नदानही केले.

Comments are closed.