क्रिकेटविश्वात नवी रनमशीन! 9 सामन्यांत ठोकली तब्बल 5 शतके
विजय हजारे ट्रॉफी 2025-26चा हंगाम संपत आला आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी विदर्भाने आपला प्रवेश निश्चित केला आहे. या स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना कर्नाटक विरुद्ध विदर्भ यांच्यात (15 जानेवारी) खेळला गेला. हा सामना विदर्भाने 6 विकेट्सने जिंकला. यावेळी विदर्भाचा एक युवा फलंदाज ज्याची क्रिकेटविश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. त्याने कामगिरीच अशी उल्लेखनीय केली आहे ज्यामुळे त्याला रनमशीन म्हणणे योग्य ठरेल. अमन मोखाडे सध्या त्याच्या तुफानी फलंदाजीने चांगलाच चर्चेत आला आहे.
मोखाडेने कर्नाटकविरुद्धच्या उपांत्य सामन्यात 138 धावांची सामनाविजयी खेळी केली आहे. त्याने ही कामगिरी त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर केली. तसेच या हंगामातील त्याची ही पहिलीच मोठी खेळी नसून त्याने मागील सामन्यांतही धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने विदर्भासाठी आतापर्यत या स्पर्धेतील 9 सामन्यात 5 शतके आणि एक अर्धशतक केले आहे.
मोखाडेने या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात 110 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात 82 धावा तर तिसऱ्या, पाचव्या आणि सहाव्या सामन्यात पुन्हा शतकी खेळी केली. ज्यामुळे संघ उपांत्य फेरीत पोहोचला.
उपांत्या सामन्यातही शतकी खेळी केल्याने मोखाडेने विजय हजारे ट्रॉफीच्या या हंगामात 700 धावांचा टप्पा पार केला आहे. सध्या तो सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये 781 धावा करत अव्वल क्रमांकावर असून कर्नाटकचा देवदत्त पड्डीकल 725 धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. 25 वर्षाच्या या खेळाडूची ही कामगिरी पाहता त्याच्यासाठी भारतीय संघाचे दार खुले झाले आहे.
त्याचबरोबर तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 1000 धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने त्याच्या 16 डावांमध्ये ही कामगिरी करताना दक्षिण आफ्रिकेच्या ग्रीम पोलाकची बरोबरी केली. मोखाडेने यशस्वी जायसवालचे प्रशिक्षक ज्वाला सिंग यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे.
लिस्ट ए क्रिकेटमध्ये वेगवान 1000 धावा (डावानुसार)-
ग्रॅमी पोलॉक – १६
अमन मोखाडे – १६
अभिनव मुकुंद – १७
देवदत्त पडिकल – १७
Comments are closed.