Vijay Hazare Trophy – बिहारची आग ओकणारी फलंदाजी! गोलंदाजांची रेकॉर्डब्रेक धुलाई करत इतिहास रचला

विजय हजारे ट्रॉफीमध्ये आजचा (24 डिसेंबर 2025) सुवर्ण अक्षरांनी नोंदवण्यात येणार आहे. एकीकडे विराट कोहली, रोहित शर्मा, इशान किशन या फलंदाजांनी धुवाँधार फटकेबाजी केली. तर दुसरीकडे बिहारच्या संघाने 50 षटकांमध्ये विश्व विक्रमी 574 धावा चोपून काढल्या. विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात बिहारचा संघ सर्वाधिक 574 धावा करणारा एकमेव संघ ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही संघाला करता आलेली नाही.
बिहार संघाने व्हीएचटीमध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध 574 धावा करत विलक्षण फलंदाजीचे प्रदर्शन केले.
वैभव सूर्यवंशी – 190 (84)
• साकिबुल गनी – १२८* (४०)
आयुष – ११६ (५६)
• पियुष सिंग – ७७ (६६)बिहारने रचला इतिहास! 🥶🔥 pic.twitter.com/0ONjZO51YX
— शानू (@Shanu_3010) 24 डिसेंबर 2025
बिहारकडून खेळताना वैभव सूर्यवंशी, साकिबूल गानी, आयुष आणि पियुश सिंग यांनी तोडफोड फटकेबाजी केली. वैभव सूर्यवंशीने आपला क्लास दाखवून देत 36 चेंडूंमध्येच वेगवान शतक ठोकण्याची किमया साधली. त्याने 84 चेंडूंमध्ये 190 धावांची खेळी केली. तर आयुषने 56 चेंडूंमध्ये 116, पियुश सिंगने 66 चेंडूंमध्ये 77 आणि साकिबूल गानीने नाबाद 40 चेंडूंमध्ये 128 धावा चोपून काढल्या. त्यामुळे बिहारने 50 षटकांमध्ये सर्वाधिक 574 धावा केल्या आणि इतिहास रचला. प्रत्युत्तरात अरुणाचल प्रदेशची गाडी 200 च्या आत बाद झाली. अरुणाचल प्रदेशचा संपूर्ण संघ 177 धावांवर बाद झाला आणि बिहारने तब्बल 397 धावांनी सामना जिंकला.

Comments are closed.