विजय हजारे ट्रॉफीमध्ये युवा खेळाडूंच्या दमदार कामगिरीने वेधलं लक्ष, भारतीय संघात मिळणार संधी?
सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hajare trophy) अनेक स्टार खेळाडूंसोबतच युवा खेळाडू देखील आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यांनंतर चार खेळाडूंनी आपल्या खेळाची छाप पाडली आहे.
ध्रुव जुरेल (उत्तर प्रदेश)
ध्रुव जुरेलची (Dhruv Jurel) फलंदाजी सध्या जोरदार सुरू आहे. त्याने केवळ 3 सामन्यांत 307 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, त्याने 153 च्या सरासरीने आणि 140 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत.
अमन मोखाडे (विदर्भ)
अमन मोखाडेने आपल्या फलंदाजीने सर्वांना थक्क केले आहे. 3 सामन्यांत त्याने 110 च्या सरासरीने 331 धावा केल्या आहेत. सध्या तो या स्पर्धेत सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
झीशान अन्सारी (उत्तर प्रदेश)
फलंदाजांसोबतच गोलंदाजीत जीशान अंसारीने आपली चमक दाखवली आहे. 3 सामन्यांत त्याने तब्बल 11 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट (धावा देण्याचे प्रमाण) फक्त 4.18 इतका कमी आहे, जे उत्कृष्ट मानले जाते.
Comments are closed.