रोहित शर्मा थोडक्यात बचावला! मैदानावर मोठा अपघात टळला, हिटमॅनला झाली असती गंभीर दुखापत
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबईकडून पहिले दोन सामने खेळला. पहिल्या सामन्यात रोहितने शानदार शतक झळकावले, तर दुसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. बाद होऊनही आपल्या लाडक्या हिटमॅनला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
26 डिसेंबर रोजी मुंबई आणि उत्तराखंड यांच्यातील सामन्यादरम्यान रोहित एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला. उत्तराखंडविरुद्धच्या या सामन्यात रोहितचा सलामीचा जोडीदार अंगकृष रघुवंशी याला दुखापत झाली.
त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याला मैदानाबाहेर नेण्यासाठी स्ट्रेचर मागवण्यात आले. हे स्ट्रेचर जेव्हा वेगाने रघुवंशीकडे नेले जात होते, तेव्हा ते रोहित शर्माला धडकणार होते. मात्र, प्रसंगावधान राखून रोहित शेवटच्या क्षणी बाजूला झाला आणि मोठी दुखापत टळली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात रोहितची प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहे. दिलासादायक बाब म्हणजे, अंगकृष रघुवंशी आता पूर्णपणे बरा आहे.
Comments are closed.