35 टक्के कमिशनखोरी हेच शिंदे गटाच्या नेत्यांचे राजकारण, विजय वडेट्टीवार यांची टीका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

माझ्यासोबत सायकलवर फिरणारे कार्यकर्ते आज फॉर्च्युनरमध्ये फिरतात. जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलंय असे धक्कादायक विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील ट्विटरवरून संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला आहे. ”शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ३५ टक्के कमिशन खातात हे मान्य केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण पण शिंदे गटाच्या नेत्यांचे राजकारण हे ३५ टक्के कमिशनखोरी आहे. आता संजय गायकवाड यांनी यावर एक पुस्तक लिहावे कमिशन कसे खावे! कारण सध्या राज्य सरकार २० टक्के कमिशनखोरी वर अडकले आहे… तर कमिशन कसे खावे याचे मार्गदर्शन संजय गायकवाड यांनी सगळ्यांना दिले पाहिजे. असेच कमिशन खा आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जा! असे ट्विट करत विजय वडेट्टीवार यांनी मिंधे गटावर निशाणा साधला.

Comments are closed.