बीड म्हणजे सापांचं बीळ झालंय, रोज नवा व्हिडीओ समोर येतो – विजय वडेट्टीवार

बीड म्हणजे सापांचं बीळ झालंय, रोज नवा व्हिडीओ समोर येतो, असं काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. बीडमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून दररोज बीड जिल्ह्यातून गुंडांकडून सामान्यांना मारहाण होत असल्याचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. यावरच आपली प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार असं म्हणाले आहेत.
माध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “बीड म्हणजे सापांच्या राजकारणाचं बीळ झालं आहे. तिथे जो घुसला तो साप, नाग, अजगर बनून येतो. कोणी विंचूही बनून येईल आणि एकमेकांना चावत राहतील. याचा चावा तू घे, तुझा चावा हा घेतो. आधी गालगुच्चे घेत होते, आता चावा घेत आहेत. अशी आता बीडची राजकीय परिस्थिती झाली आहे.”
Comments are closed.