Vijay wadettiwar says mahavikas aghadi took 20 days for seat sharing lossed maharashtra assembly election 2024 vvp96
महाविकास आघाडीतील अनेक नेतेमंडळी हे विधानसभेतील पराभवावरून एकमेकांवर आरोप करताना सातत्याने पाहायला मिळतं आहे. नुकताच काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी मविआच्या पराभवावर भाष्य केलं. त्यावेळी मविआच्या जागावाटपाची जबाबदारी असलेल्या खासदार संजय राऊत आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.
मुंबई : राज्यात नुकताच विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जोरदार प्रचार केला. विधानसभेपूर्वी झालेल्या लोकसभेतील प्रचाराचे मुद्दे पुन्हा उपस्थित करत जनतेला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला, पण जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने गेला. मात्र, आता महाविकास आघाडीतील अनेक नेतेमंडळी हे विधानसभेतील पराभवावरून एकमेकांवर आरोप करताना सातत्याने पाहायला मिळतं आहे. नुकताच काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी मविआच्या पराभवावर भाष्य केलं. त्यावेळी मविआच्या जागावाटपाची जबाबदारी असलेल्या खासदार संजय राऊत आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. (vijay wadettiwar says mahavikas aghadi took 20 days for seat sharing lossed maharashtra assembly election 2024)
नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीच्या पराभवावर भाष्य केले. त्यानुसार, “विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणं बरीच आहेत. जागावाटपासाठी बराच वेळ गेला. जागांचा घोळ सोडवण्यासाठी मविआ नेत्यांना 20 दिवस लागले. 20 दिवस जागांचा घोळ कायम ठेवण्यात आला. नाना पटोले व संजय राऊत हे प्रमुख नेते तिथे होते. आम्ही देखील होतो. जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत सोडवला असता तर, आम्हाला प्रचारासाठी 18 दिवस मिळाले असते. त्यामुळे आम्ही योग्य योजना आखू शकलो असतो. परंतु, आम्ही 20 दिवस जागांचा घोळ कायम ठेवला. त्यामुळे आम्ही योजना आखू शकलो नाही. आम्हाला योग्य प्रकारे प्रचार करता आला नाही. निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांना संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही. हे आमच्या पराभवाचं प्रमुख कारण असेल असं मला वाटतं”, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
– Advertisement –
शिवाय, “आम्ही जागावाटपात वेळ वाया घालवला. बऱ्याचदा जागावाटप करण्यासाठी सकाळी 11 वाजता बैठक बोलावली जायची. मात्र, अनेक नेते या बैठकीला दुपारी 2 वाजता यायचे. अनेक नेत्यांना उशीर व्हायचा. मी कोणाचंही नाव घेणार नाही. परंतु, या बैठका लांबत गेल्या एकेका जागेवरून वारंवार चर्चा झाल्या. त्याच त्याच गोष्टींवर पुन्हा पुन्हा चर्चा होत गेली”, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, मविआच्या निवडणुकीतील पराभवाबद्दल बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्याकडे बोट दाखवलं. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असून राज्यात महायुतीने प्रचंड बहुमतासह सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर आता मविआ नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणं सुरू केलं आहे.
– Advertisement –
हेही वाचा – Women Voters : देशातील निवडणुकांमध्ये महिला मतदानाचा टक्का वाढला; ‘या’ दोन योजना ठरल्या सरस
Comments are closed.