विक्रोळी मिनी मॅरेथॉनमध्ये सुमीत गोराई अव्वल

सार्वजनिक गणेशोत्सव समिती, विक्रोळीचा महाराजा,  ओम साईधाम सेवा मंडळ आणि साईमंदिर, टागोर नगर (विक्रोळी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विक्रोळी मिनी मॅरेथॉन स्पर्धेत सुमीत कुमार गोराई यांनी अव्वल स्थान पटकावले तर आकाश चौहान यांना दुसरा क्रमांक संपादता आला.

गेली तीन वर्षे सातत्याने भव्य आणि दिव्य आयोजन केले जात असलेल्या या स्पर्धेत यंदाही मोठय़ा संख्येने धावपटू सहभागी झाले होते. आपण गेल्या तीन वर्षांपासून मिनी मॅरेथॉन धावण्याची स्पर्धा घेत आहोत. पुरुषांप्रमाणे महिला स्पर्धकांनी या शर्यतीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. महिला गटात पिंपरी-चिंचवडच्या यामिनी ठाकरे यांनी जेतेपद संपादले तर भोपाळच्या प्राची पडियारने दुसरे स्थान काबीज केले.

शास्त्रज्ञांचाही समावेश

इस्रोने नुकतेच 100वे अंतराळ यान प्रक्षेपित केल होते, त्यात गोदरेजच्या विक्रोळी प्लांटमधील पाच शास्त्रज्ञांचाही समावेश होता. ते पाचही शास्त्रज्ञ आलोक सिंह, युवराज जगताप, अतुल रावल, प्रमोद कुमार यादव आणि संजय इंगळे यांनीही मिनी मॅरेथॉनमध्ये धाव घेतली. तसेच हिलिंग टच या संस्थेच्या 25 विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. या मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी वरिष्ठ नागरिक, शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक तसेच विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे शुभ वास्तू लाईफ स्पेसचे सत्यानंदन, अयुब, जितेंद्र माने, एमओडीचे तारक भट्टाचार्य, संतोषजी डोईपह्डे, विध्नहर्ता ग्रुपचे अजित चव्हाण तसेच नझमुद्धीन, राज करकेरा, प्रशांत दास, संदेश परब, रश्मी पहूडकर, अक्षता सावंत, प्रसाद राऊळ, सिराज भाई, विरा पंन्ट्रक्शनचे  गणपतलाल जैन, कॅप्टन डी.व्ही. कोपीकर, अनिल घाटकर, शुभम घाटकर, व्ही.डी. सावंत, तसेच राजोल पाटील, पावर प्लस, हिमिझ बर्क यांनीही आर्थिक सहकार्य केले.

Comments are closed.