रीलमधील ‘मुसाफिर कॅफे’ आता रिअल लाईफमध्ये! विक्रांत मॅसी चाहत्यांसाठी घेऊन येतोय खास भेट
बॉलिवूड अभिनेता विक्रांत मॅसी आपल्या चाहत्यांसाठी एक खास सरप्राईज दिलं आहे. त्याच्या गाजलेल्या ‘मुसाफिर कॅफे’ या सिरीजमधील प्रसिद्ध कॅफे आता रीलवरून रिअल लाईफमध्ये साकारत आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या नयनरम्य पर्वतरांगांमध्ये विक्रांत नवा ‘मुसाफिर कॅफे’ सुरू करत आहे. या कॅफेच्या बांधकामाचे काम वेगात सुरू असून त्याच्या कॅफेची पहिली झलक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या कॅफेची रचना संपूर्णपणे वुडन थीमवर आधारित असून, या सिरीजमध्ये दाखवलेला कोजी लुक आणि शांत वातावरण प्रत्यक्ष अनुभवायला मिळावे अशा प्रकारे या कॅफेची उभारणी केली जाणार आहे. तसेच या कॅफेमध्ये पर्यटकांच्या राहण्यासाठी 20 खोल्यांचाही समावेश केला जाणार आहे. यामध्ये कलाकारांसाठी विशेष ‘आर्टिस्ट रेसिडेन्सी’ तयार करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे.
इन्स्टाग्रामवर ही पोस्ट पहा
विक्रांतचे पर्वतांशी अत्यंत खास आणि जवळचे नाते आहे. त्याची पत्नी अभिनेत्री शीतल ठाकूर ही मूळची हिमाचल प्रदेशची असून, 2022 मध्ये त्यांचा विवाह पारंपरिक हिमाचली पद्धतीने झाला होता. त्यामुळेच पर्वतांवरील निसर्गरम्य वातावरणाबद्दल विक्रांतला विशेष आपुलकी आहे आणि याच प्रेमापोटी तो हा कॅफे साकारत आहे.
Comments are closed.