विलेपार्ले येथे आजपासून ग्रंथोत्सव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्र राज्याच्या ग्रंथालय संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने आम्ही विलेपार्ले कल्चरल सेंटर द्वारे ग्रंथोत्सवाचे आयोजन शनिवार आणि रविवारी  विलेपार्ले येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा पेंद्र येथे केले आहे. ग्रंथोत्सवाचा शुभारंभ शनिवार सकाळी 9 वाजता, लोकमान्य सेवा संघाच्या प्रांगणामधून ग्रंथ दिंडी द्वारे होणार आहे.  सकाळी 10 वाजता ज्येष्ठ साहित्यिक अशोक नायगावकर यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न होईल. यावेळी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार उपस्थित राहतील, अशी माहिती विलेपार्ले कल्चरल सेंटरचे अध्यक्ष, आमदार पराग अळवणी यांनी दिली.

Comments are closed.