गावकरी बिहार मंत्री श्रावण कुमारवर हल्ला करतात

पाटणा :

रस्ते दुर्घटनेतील पीडित परिवाराची भेट घेण्यासाठी पोहोचलेले बिहारचे मंत्री आणि आमदारावर ग्रामस्थांनी हल्ला केला आहे. पाटण्यातील शाहजहांपूर येथे ट्रक आणि रिक्षाच्या टक्करीत 9 जणांचा मृत्यू झाला होता. सर्व मृत नालंदा जिल्ह्यातील मलावां गावाचे रहिवासी होते. बुधवारी ग्रामविकास मंत्री श्रवण कुमार हे पीडित परिवारांची भेट घेण्यासाठी गावात पोहोचले होते. मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत परतू पाहणाऱ्या दोन्ही नेत्यांना ग्रामस्थांनी थांबण्याचा आग्रह केला. परंतु दोन्ही नेत्यांनी पुढील कार्यक्रमाचा दाखला देत जाण्याचा निर्णय घेतल्याने जमाव संतापला. दुर्घटनेच्या दिवशी मंत्र्यांच्या सुचनेवरूनच रोखलेली वाहतूक पूर्ववत केली होती, परंतु योग्य भरपाई मिळाली नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी अचानक लाठ्यांनी मंत्री आणि आमदारावर हल्ला केला.

स्थिती बिघडल्याने दोन्ही नेत्यांनी गावातून पळ काढत स्वत:चा जीव वाचविला आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेत संतप्त ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

 

Comments are closed.