विनेश फोगाटने दिली गुड न्यूज, लवकरच आई होणार!
(Vinesh Phogat pregnancy news) भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे की ती लवकरच आई होणार आहे. विनेशने सोशल मीडियाद्वारे ही माहिती शेअर केली आहे. विनेशने 2018 मध्ये सहकारी कुस्तीगीर सोमवीर राठीशी लग्न केले. सोमवीर हा देखील व्यवसायाने कुस्तीगीर आहे. पॅरिस ऑलिंपिक 2024च्या निराशेनंतर 30 वर्षीय विनेश फोगटने कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली होती. दरम्यान आता या जोडीसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. (Vinesh Phogat expecting baby)
विनेश फोगटने सोशल मीडियावर स्वतःचा आणि सोमवीर राठीचा एक फोटो शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, “आमची प्रेमकहाणी सुरूच आहे, ज्यामध्ये आता एक नवीन अध्याय जोडला जाणार आहे.” इतर भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी कमेंट सेक्शनमध्ये विनेश आणि सोमवीर यांना अभिनंदन संदेश पाठवले. कमेंट सेक्शनमध्ये भारतीय कुस्तीगीरासाठी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (Vinesh Phogat shared pregnancy news by social media)
ऑलिम्पिकमधील अंतिम सामन्यापूर्वी विनेश फोगटचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम वाढल्याने तिला पॅरिस ऑलिंपिक 2024 साठी अपात्र ठरवण्यात आले. ऑलिम्पिक संपल्यानंतर विनेश भारतात परतली तेव्हा काही दिवसांनी तिने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.
त्यानंतर विनेशने राजकारणात प्रवेश केला. तिने काँग्रेस पक्षात प्रवेश करत 2024 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना जागा जिंकली. दरम्यान, विनेशने कुस्तीत परतण्याचे संकेतही दिले आहेत, परंतु तिच्याकडून याबाबत कोणतीही पुष्टी मिळालेली नाही.
Comments are closed.