तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणेला भाजपाकडून थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी; राजकीय व


तुळजापूर अमली पदार्थ प्रकरण विनोद गंगणे : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील (Tuljapur Drug Case) आरोपी विनोद गंगणेला (Vinod Gangane) भाजपाकडून थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याचं समोर आलं आहे. राज्यभर गाजलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीलाच भाजपाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरण उजेडात आणायला विनोद गंगणे यांचीच मदत झाल्याचा दावा भाजपकडून कण्यात येत आहे.

विनोद गंगणे हा ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असून तो सध्या जामीनावर बाहेर आहे. ड्रग्ज प्रकरणात काही दिवस विनोद गंगणेची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. त्यातच आता  विनोद गंगणे याला भाजपाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने निवडणुकीत तुळजापूर ड्रग्जचा मुद्दा पुन्हा एखदा चर्चेत आला आहे. दरम्यान, काही दिवसापुर्वीच ड्रग्ज प्रकरणातील जामीनावर बाहेर असणारा आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वरला भाजपमध्ये प्रवेश दिल्याने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर झाली टीका होती. भाजप ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना राजाश्रय देत असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले? (Vijay Wadettiwar On BJP)

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणेला भाजपाकडून थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आता लोकप्रतिनिधी होणार?, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. महायुती सरकारची वॉशिंग मशीन तर कमालच करते, पहिले भ्रष्ट लोकांना पवित्र करत होते आता तर ड्रग प्रकरणात तीन महिने तुरुंगात गेलेली व्यक्ती थेट भाजपकडून उमेदवार असल्याचे वृत्त आहे. ज्या पोलिसांनी हा विनोद गंगणे पकडला असेल, त्यांच्याच मनात प्रश्न निर्माण झाला असेल, आम्ही गुन्हेगार पकडायचे की सरकारला उमेदवार मिळवून द्यायचे?, यापुढे ड्रग, चोरी, दरोडा अशा प्रकरणात कारवाई करताना पोलिस दहा वेळा विचार करतील. कारण गृहमंत्री त्याला क्लीनचिट देऊन थेट पक्षात प्रवेश देतील, तिकीट देतील आणि नेता बनवतील. कदाचित यापुढे गृहविभाग असेच गुन्हेगार शोधण्यासाठी विशेष अभियान राबवून भाजपला उमेदवार शोधून देण्याचे राष्ट्रकार्य करेल काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला तर नवल वाटू नये, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.

नेमकं प्रकरण काय? (Tuljapur Drug Case)

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे एप्रिल 2025 मध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी ड्रग्सचा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी 2.5 लाख रुपये किमतीचे 59 पुड्या ड्रग्स जप्त केले आणि काही आरोपींना अटक केली. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक माहिती समोर आली, ज्यात तुळजाभवानी मंदिरातील तब्बल 13 पुजाऱ्यांचा ड्रग्स तस्करीमध्ये सहभाग असल्याचे उघड झाले. या पुजाऱ्यांचा राजकीय पक्षांशी संबंध असल्याची माहितीही समोर आली होती. सदर प्रकरणी अनेक आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर काही आरोपींना जामीनावर सोडण्यात आले.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

आणखी वाचा

Comments are closed.