Vinod Kambli gets a helping hand from Dr. Shrikant Shinde Foundation PPK


प्रकृती अस्वस्थामुळे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता त्यांच्या प्रकृतीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीय सहाय्यक मंगेश चिवटेंच्या मार्फत विचारपूस केली असून त्यांना मदत जाहीर केली आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हे गेल्या काही दिवसांपासून सर्वांच्या चर्चेचा विषय बनलेले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांना प्रकृती अस्वस्थामुळे तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी काही सामाजिक संघटनांनी त्यांची विचारपूस करून त्यांच्यासाठी मदत जाहीर केली आहे. परंतु, आता खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनोद कांबळी यांची विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे. दरे गावात मुक्कामी असलेले उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः विनोद कांबळी यांची भेट घेतलेली नसली तरी त्यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांनी कांबळी यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे. (Vinod Kambli gets a helping hand from Dr. Shrikant Shinde Foundation)

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची अनेक वर्षांपासून प्रकृती ठीक नाही, याची सर्वांनाच कल्पना आहे. परंतु, आता पुन्हा त्यांना प्रकृती अस्वस्थामुळे भिवंडीतील काल्हेर येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या विनोद कांबळींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. परंतु, विनोद कांबळी यांच्या उपचारात कोणतीही गोष्ट कमी राहणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, त्यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांच्याकडून डॉक्टरांना करण्यात आलेल्या आहेत. तसेच, कांबळी यांची सध्याची परिस्थिती पाहता कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विनोद कांबळींना वैयक्तिक 5 लाख रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून ही मदत पूढील आठवड्यात करण्यात येणार असून येणाऱ्या काळात त्यांना अजून मदत करण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिल्याचे मंगेश चिवटे यांनी सांगितले.

– Advertisement –

हेही वाचा… Vinod Kambli : आजारी विनोद कांबळीचा रुग्णालयातून सचिन तेंडुलकरला खास निरोप; म्हटले…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनोद कांबळी यांच्या प्रकृतीची आणि परिस्थिची दखल घेत त्यांना मदत जाहीर केल्याने याबाबत कांबळी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच शिंदे यांनी त्यांची हॉस्पिटलमध्ये येऊन भेट घ्यावी, अशी विनंती केली. त्यामुळे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे हे क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची भेट घेऊन कांबळी परिवाराला मदत करणार आहेत, अशी माहिती शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांच्याकडून देण्यात आली आहे. तर, विनोद कांबळी यांची प्रकृती आता ठीक असल्याचे समोर आले आहे. तसेच विनोद कांबळींच्या मूत्राशयाला संसर्ग झाला असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे, अशी माहिती आकृती रुग्णालयाचे डॉ. शैलेश सिंह ठाकूर यांनी दिली.


Edited By Poonam Khadtale



Source link

Comments are closed.