विनोद कांबळींना नीट बोलता-चालता येईना; भावाने दिली महत्वाची माहिती, म्हणाला, प्रार्थना करा…
विनोद कंबली आरोग्य अद्यतने: भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू विनोद कांबळी (Vinod Kambli) यांची प्रकृती ठिक नसल्याची माहिती समोर आली आहे. विनोद कांबळींना अजूनही स्पष्ट बोलता येत नाहीय, अशी माहिती त्यांचा भाऊ वीरेंद्र कांबळी यांनी एका प्रॉडकास्टमध्ये दिली. विनोद कांबळी एक चॅम्पियन आहे, तो नक्कीच पुनरागमन करेल. मला विश्वास आहे की तो चालेल, धावेल आणि कदाचित पुन्हा मैदानावरही दिसेल, अशा भावना देखील वीरेंद्र कांबळींनी व्यक्त केल्या.
वीरेंद्र कांबळी म्हणाले की, विनोद कांबळी सध्या घरी आहे आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे, परंतु त्यांच्यावर उपचार अजूनही सुरू आहेत. विनोद कांबळी अद्याप पूर्णपणे बरे झालेले नाही. त्यांना बोलण्यात अडचण येत आहे. तसेच विनोद कांबळींना नीट चालताही येत नाहीय. त्याला बरं होण्यासाठी वेळ लागेल, पण तो एक चॅम्पियन आहे आणि पुनरागमन करेल, असा विश्वासही वीरेंद्र कांबळींनी व्यक्त केला. मी चाहत्यांना फक्त एवढेच सांगू इच्छितो की तो बरा व्हावा यासाठी प्रार्थना करा. त्याला तुमच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची गरज आहे, असंही वीरेंद्र कांबळींनी सांगितले. दरम्यान, विनोद कांबळींना याआधी युरिन इन्फेक्शन झाले होते. जरी ते नंतर बरे झाले असले तरी डिसेंबरमध्ये ही समस्या पुन्हा वाढली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तपासणीत त्यांच्या मेंदूत एक गाठ आढळली. उपचार आणि देखरेखीनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
विनोद कांबळींना झालेला आजार किती धोकादायक आहे? (Vinod Kambli Health Updates)
विनोद काबळींची प्रकृती गंभीर आहे. कारण त्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त समस्या येत आहेत. लघवीचा संसर्ग, पेटके आणि मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या यामुळे त्याची मज्जासंस्था आणि मूत्रपिंड कमकुवत होत आहेत. बोलण्यात आणि चालण्यात अडचण, अशक्तपणा आणि थकवा यामुळे त्याच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. वेळेवर उपचार न केल्यास मूत्रपिंड निकामी होणे, स्ट्रोक किंवा कायमचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच, त्याचा आजार केवळ एक समस्या नाही तर खूप धोकादायक आहे.
विनोद कांबळींची कारकीर्द-
विनोद कांबळीने 1993 ते 2000 दरम्यान भारतासाठी 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळले. विनोद कांबळी 1000 कसोटी धावा करणारा सर्वात जलद भारतीय फलंदाज आहे. हा एक विक्रम आजपर्यंत कायम आहे. 1991 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू करूनही, भारतासाठी 104 एकदिवसीय सामने आणि 17 कसोटी सामने खेळूनही त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द एका दशकापेक्षा कमी काळ टिकली. कांबळीने 17 कसोटी सामन्यात 54.20 च्या सरासरीने 1084 धावा केल्या. यामध्ये चार शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, त्याने 104 एकदिवसीय सामन्यांमध्ये 32.59 च्या सरासरीने 2477 धावा केल्या. यामध्ये दोन शतके आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 129 सामन्यांमध्ये 59.67 च्या सरासरीने 9965 धावा केल्या. यामध्ये 35 शतके आणि 44 अर्धशतकांचा समावेश आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
संबंधित बातमी:
Vinod Kambli: विनोद कांबळी कोणात्या आजाराशी झुंज देतोय?; वैद्यकीय अहवाल पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
आणखी वाचा
Comments are closed.