मणिपूरच्या उखरुलमध्ये हिंसाचार उसळला आहे

5 दिवसांसाठी इंटरनेट बंद : प्रशासनाकडून संचारबंदी लागू

वृत्तसंस्था/ इंफाळ

मणिपूरच्या उखरुलमध्ये हिंसा भडकली असून काही सशस्त्र गुडांनी लिटन सारेइखेंग गावात काही घरांना पेटवू दिले आहे. या घटनेनंतर स्थिती बिघडण्याची शक्यता पाहता प्रशासनाने पूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करत इंटरनेट सेवा 5 दिवसांसाठी निलंबित केली आहे. अफवा फैलावण्यापासून रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

सशस्त्र सुमहांनी पर्वतीय गावाच्या नजीक हवेत गोळीबार केल्याने दहशत निर्माण झाली. अनेक ग्रामस्थांनी आवश्यक सामग्रीसह शेजारच्या कांगपोकी जिल्ह्dयाच्या सुरक्षित क्षेत्रांच्या दिशेने पलायन केले आहे तर तांगखुल गावातील अनेक लोकांनीही सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे.

कायदा-सुव्यवस्थेची बिघडती स्थिती पाहता मणिपूर सरकारच्या गृह आयुक्तांनी सार्वजनिक सुरक्षा आणि शांततेला धोका असल्यामुळे उखरुल जिल्ह्यात तत्काळ प्रभावाने इंटरनेट सेवा 5 दिवसांसाठी निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे. अलिकडच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात अशांतता फैलावली असून चुकीच्या माहितीच्या प्रसारामुळे तणाव वाढू शकतो. याचमुळे स्थितीला नियंत्रित करणे आणि अफवा रोखण्यापासून इंटरनेट सेवा अस्थायी स्वरुपात बंद केली जात असल्याचे आदेशात म्हटले गेले आहे. तर जाळपोळीच्या घटनानंतर उखरुल जिल्ह्याच्या काही हिस्स्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच हिंसा रोखण्यासाठी सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

उखरुलमध्ये हिंसेची सुरुवात शनिवारी रात्री झाली होती. तेव्हा लीटन गावात 7-8 लोकांन तांगखुल नागा समुदायाच्या एका व्यक्तीला मारहाण केली होती. रविवारी याप्रकरणी बैठक होणार होती, परंतु ती होऊ शकली नव्हती. यानंतर सोमवारी मध्यरात्री काही सशस्त्र गुंडांनी लीटन सारईखोंगमध्ये तांगखुल नागा समुदायाच्या घरांना पेटवून दिले, ज्यानंतर नागा समुदायाने कुकी समुदायाच्या घरांना लक्ष्य केले. पोलिसांनुसार के. लुंगविराम गावातही एका घरात पेटवून देण्यात आले होते. सुरक्षा दलांनी त्वरित तेथे धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले होते.

Comments are closed.