'पैसे परत करा' – पाकिस्तानी चाहत्यांचा संताप, PCBचा मोठा निर्णय
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील काही सामने अडथळ्यांशिवाय पूर्ण झाले. पण मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तान मधील हवामान बदलले आहे. त्यामध्ये मागच्या चार सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये पावसाचे सावट आले आहे. यामध्ये अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सगळ्यात महत्त्वाचा ठरणार होता. कारण या सामन्यानंतरच अफगाणिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकणार आहे.
हा सामना पाहण्यासाठी हजारो चाहते स्टेडियम मध्ये पोहोचले होते. पण त्यांना निराश होऊन घरी परतावे लागले. त्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चाहत्यांना पैसे परत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
पीसीबीने प्रेस रिलीज द्वारे सांगितले आहे की रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम मध्ये पावसाच्या कारणाने चॅम्पियन्स ट्रॉफी मधील दोन सामने न खेळता रद्द करण्यात आले. 25 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि 27 फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया ह्या सामन्याचं नाणेफेक सुद्धा होऊ शकलं नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बनवण्यात आलेल्या पीसीबी तिकीट रिफंड पॉलिसी अंतर्गत जर कोणता सामना नाणेफेक न होता रद्द करण्यात आला तर त्या दरम्यान पाकिस्तान सर्व प्रेक्षकांचे पैसे परत करणार आहे. तसेच हॉस्पिटलिटी बॉक्स मधील प्रायव्हेट सीट वरील लोकांना पैसे परत दिले जाणार नाहीत. ज्या लोकांना पैसे परत हवे असतील त्यांनी 10 मार्च ते 14 मार्च पर्यंत रिफंड साठी मागणी करावी लागेल.
अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान जेव्हा पाऊस यायला सुरुवात झाली तेव्हा मैदानावरील पाणी वाईपरणे काढण्यात येत होते. पाकिस्तानवर यामुळेही टीका झाली आहे की त्यांच्या स्टाफ ने फोमद्वारे मैदानातील पाणी पुसण्याचा प्रयत्न केला.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेची सुरुवात 19 फेब्रुवारी रोजी झाली आहे. इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिका या स्पर्धेचा 11वा सामना आहे. स्पर्धेतील 12वा सामना भारत आणि न्यूझीलंड संघात 2 मार्च रोजी खेळला जाणार आहे. यानंतर 4 आणि 5 मार्च रोजी सेमीफायनल सामने खेळले जाणार आहेत. 9 मार्च रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. जर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला तर त्यांचा सामना दुबईमध्ये खेळला जाईल आणि जर भारतीय संघाशिवाय जर कोणत्या दोन संघामध्ये अंतिम सामना झाला तर तो पाकिस्तानच्या मैदानावर खेळला जाईल.
Comments are closed.