महाकुंभमधील व्हायरल गर्ल मोनालिसाने केलं पळून जाऊन बाॅयफ्रेंडसोबत लग्न
महाकुंभमेळ्यादरम्यान सोशल मीडियावर निळ्या-तपकिरी डोळ्यांमुळे रातोरात प्रसिद्ध झालेली मोनालिसा भोसले पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण मात्र वेगळे आहे. वृत्तानुसार, महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसा तिच्या मुस्लिम बॉयफ्रेंड फरमानसह केरळमधील तिरुअनंतपुरममधील तम्पनूर पोलिस स्टेशनमध्ये गेली. यावेळी तिने पोलिसांना संरक्षणाची विनंती केली. तिने पोलिसांना सांगितले की, तिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहायचे आहे आणि लवकरच त्याच्याशी लग्न करायचे आहे. त्यानंतर तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं आहे. केरळच्या तिरुअनंतपूरम येथील मंदिरात जाऊन तिने आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. तिच्या नवऱ्याचे नाव फरमान खान असे आहे.
मोनालिसाचा आरोप आहे की, तिच्या कुटुंबाला हे नाते मान्य नाही. विशेषतः तिचे वडील जयसिंग भोसले यांचा याला तीव्र विरोध आहे. तिच्या कुटुंबाकडून तिच्यावर दबाव आणला जात होता कारण ते वेगवेगळ्या धर्माचे आहेत. मोनालिसाचा दावा आहे की, तिला जबरदस्तीने घरी परतण्याची धमकी दिली जात होती. परिणामी, ती घर सोडून तिच्या प्रियकरासह केरळला गेली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान, मोनालिसा आणि फरमान यांनी सांगितले की ते सुमारे दीड वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते आणि फेसबुकद्वारे भेटले होते. त्यांनी असेही सांगितले की त्यांनी सामाजिक आणि धार्मिक दबावापासून वाचण्यासाठी केरळमध्ये येण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी मोनालिसाच्या कागदपत्रांची तपासणी केली तेव्हा ती प्रौढ असल्याचे आढळून आले. त्यानंतर तिच्या वडिलांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले, परंतु कायद्यानुसार ते प्रौढ असल्याने पोलिसांनी त्यांना त्यांच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे पुढे जाण्यास परवानगी दिली.
मोनालिसा आणि फरमान खान हे गेल्या दीड वर्षांपासून प्रेमात होते. फरमान खान हा महाराष्ट्राचा आहे. तर मोनालिसा मध्य प्रदेशमधील इंदोर शहरातील आहे. या लग्नाला मोनालिसाच्या कुटुंबीयांकडून विरोध होता. माझ्या घरचे या लग्नाला होकार देणार नाहीत, हे लक्षात येताच मोनालिसाने थेट केरळ गाठलं आणि आपला प्रियकर फरमान खान याच्याशी लग्न केलं आहे. लग्न करण्यासाठी मोनालिसाने तिरुअंनतपूरम येथे जाऊन पोलिसांना संरक्षण मागितले होते.
Comments are closed.