ट्रेंड – ‘वेड लावलं’ गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स
सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा डान्स चांगलाच व्हायरल झाला आहे. सारेगम मराठीचे जोरदार ट्रेंडमध्ये असलेले ‘तुझ्या रूपानं वेड लावलं, बाई मला गं वेड लावलं..’ या ट्रेंडिंग गाण्यावर सादर केलेल्या चिमुकलीच्या नृत्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. तिच्या अचूक हुक स्टेप्स, आत्मविश्वास, टायमिंग आणि चेहऱयावरील हावभाव पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ shivu._9780 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ अपलोड होताच अल्पावधीतच तो प्रचंड व्हायरल झाला. नेटकऱयांनी या डान्सला भरभरून प्रतिसाद देत हजारो लाईक्स व कमेंटचा वर्षाव केला आहे.
Comments are closed.