ट्रेंड – कोरियात शाकाहारींचा संघर्ष

दक्षिण कोरियात हिंदुस्थानी तरुणीला शाकाहारी जेवणासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय. तिला भेंडी खायची इच्छा आहे, पण ती मिळत नाही, अशी व्यथा खुशी नावाच्या तरुणीने व्हिडीओच्या माध्यमातून सांगितली आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. खुशी म्हणते, कोरिया हा मुख्यतः मांसाहारी आणि समुद्री अन्नावर आधारित देश आहे. कोरियन जेवणात मासे, डुकराचे मांस आणि गोमांस व सॉसेजेसचा मोठा वापर होतो. भेंडी, डाळी आणि इतर पारंपरिक हिंदुस्थानी भाज्या कमी उपलब्ध असल्यामुळे रोजच्या आहारात तडजोड करावी लागते. खुशी पुढे सांगते की, मी डुकराचे मांस आणि गोमांस खाऊ शकत नाही. चिकन खाणे ठीक आहे, पण लहानपणापासून माझ्या आईने मला कधीही ते खायला लावले नाही. म्हणून मी आता ते खाऊ शकत नाही, पण मी अंडी खाल्ली आहेत. त्यामुळे मी येथे अंडी खाऊ शकते. दक्षिण कोरियात मी फक्त भाज्या खाते. हे जेव्हा लोकांना समजते, तेव्हा धक्का बसतो.

Comments are closed.