Virar building collapse – विरार इमारत दुर्घटनेप्रकरणी 5 जणांना अटक, न्यायालयात हजर करणार

विरारमधील ‘रमाबाई अपार्टमेंट’ या चार मजली इमारतीचा भाग कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला. या इमारत दुर्घटनेच्या तपासाला आता वेग आला आहे. या प्रकरणाचा तपास आता विरार पोलिसांकडून गुन्हे शाखा कक्षा ३ कडे सोपविण्यात आला आहे. विरार पोलिसांनी बुधवारी इमारत विकासाला अटक केल्यानंतर शुक्रवारी भागीदार असलेल्या आणि जमीन मालक असलेल्या इतर चार जणांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकारांत आत्तापर्यंत एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

‘रमाबाई अपार्टमेंट’ ही इमारत पालिकेची कोणतीही परवानगी न देता अनधिकृतपणे बांधण्यात आल्याने या प्रकरणी पालिकेने तक्रार दिल्यानंतर विरार पोलिसांनी तात्काळ विकासकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्यानंतर हा तपास गुन्हे शाखा कक्षा ३ कडे सोपविण्यात आला. नितल साने असे अटक केलेल्या विकासकाचे नाव असून पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली आहे. या तपासादरम्यान पोलिसांना या इमारतीमध्ये दळवी कुटुंब भागीदार असल्याचे समोर आले.

दळवी कुटुंबातील मूळ मालक याचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाल्यानंतर ती जमीन आता त्याच्या दोन मुली आणि जावई यांच्या नावावर आहे. त्यामुळे भागीदारी करत रमाबाई अपार्टमेंट मधील ५४ फ्लॅट्स आणि ६ दुकानांपैकी ३२ फ्लॅट आणि ३ दुकाने ही साने याच्या मालकीची होती आणि २२ फ्लॅट, ३ दुकाने ही दळवी कुटुंबातील दोन मुलींच्या नावे. त्यातील ११ सदनिका या अजूनही दळवी यांच्या दोन मुली यांच्या नावावर आहेत.

सन्नाटा आणि ढिगाऱ्याखाली दबलेले संसार.. ‘रमाबाई’चे बचावकार्य 40 तासांनंतर थांबले

सर्व फ्लॅट्स साने किंवा दळवी यांनी नोटरी पद्धतीने रहिवाशांना विकल्याचे समोर आल्याने गुन्हे शाखा कक्ष ३ यांनी या प्रकरणी दळवी कुटुंबातील २ मुली आणि या कुटुंबाचे २ जावई यांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. आज या पाच जणांना वस‌ई सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.

पहिला वाढदिवस ठरला शेवटचा, केक कापला अन् 5 मिनिटात इमारत कोसळली; माय-लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता

Comments are closed.