सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">पालघर : विरारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विरार फाट्याजवळील पिरकुंडा दर्ग्याजवळ एका ओसाड ठिकाणी एका सुटकेसमध्ये महिलेचे मुंडके आढळले आहे. स्थानिक मुलांनी ही सुटकेस उघडल्यानंवर हा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार, सदर महिला पश्चिम बंगालची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तिच्या शरीराचे इतर अवयव कुठे आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
होळीच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. महिलेची हत्या करून तिच्या शरीराचे अवयव वेगवेगळे करून ती सुटकेसमध्ये टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
कलिना येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी अधिकचा तपास केला. मांडवी पोलिस या हत्येचा तपास करत असून, हा गुन्हा कोणी आणि कोणत्या कारणाने केला याचा शोध घेत आहेत.
अहिल्यानगरमध्ये शीर, हात नसलेला मृतदेह
अहिल्यानगरमध्ये एका विहिरीत शीर, हात नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शीर, दोन्ही हात, एक पाय नसलेल्या एका अनोळखी तरुणाचा मृतदेह दाणेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील विहिरीत 12 मार्च रोजी सकाळी आढळला. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. तर या मृतदेहाची ओळख पटवण्याचं आव्हान देखील पोलिसांसमोर असणार आहे.
हा मृतदेह वीस वर्षीय तरुणाचा असावा आणि त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी श्रीगोंदा-शिरुर तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या दाणेवाडी शिवारातील विहिरीत मृतदेह टाकला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. विहिरीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह कोणाचा आहे? याचा शोध घेण्यात येत आहे.
दाणेवाडी येथील विठ्ठल दगडू मांडगे यांच्या मालकीची ही विहीर आहे. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. हा तरुण नेमका कोणत्या गावातील आहे, त्याची हत्या नेमकी कोणी केली, कुठे केली, व का केली, या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. त्याचबरोबर त्याची ओळख पटवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत.
ही y तमी yasas: & nbsp;
- <ली शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;"> <एक href ="https://marathi.tezzbuzz.com/crime/satish-hosale-khokya-hosale-bed-forest-department-crime-crime-marathi-news-1349089">Satish Bhosale : खोक्या भोसलेच्या घरावर बुलडोझर फिरवला, घर पाडलं; वनविभागाची मोठी कारवाई
Comments are closed.