विराट-रोहितचं नाव अनिश्चित, पण हा खेळाडू 2027 वर्ल्ड कपमध्ये नक्की खेळणार! जाणून घ्या सविस्तर
वर्ल्ड कप 2027 (world cup 2027) सुरू होण्यासाठी अजून बराच वेळ आहे, पण भारतीय संघातील खेळाडू आधीपासूनच संघात स्थान मिळवण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Kohli & Rohit Sharma) पुढचा वर्ल्ड कप खेळतील का, हे अजून निश्चित नाही. या दोघांचे नाव संघात निश्चित झालेले नसताना, भारताचा अष्टपैलू गोलंदाज शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) मात्र वर्ल्ड कपसाठी संघात आपली जागा पक्की करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
शार्दुल ठाकूर शेवटचा वेळ वर्ल्ड कप 2023 मध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात खेळताना दिसला होता. गेल्या सुमारे दोन वर्षांपासून शार्दुल भारताच्या वनडे संघाचा भाग नाही. संघात पुनरागमनाबद्दल बोलताना शार्दुल ठाकूर म्हणाला की, माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सातत्याने क्रिकेट खेळत राहणे आणि उत्तम कामगिरी करणे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी मला दररोज स्वतःचा खेळ अधिकाधिक सुधारावा लागेल.
शार्दुल पुढे म्हणाला, “पुढचा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये आठव्या क्रमांकावर गोलंदाजी करणारा ऑलराउंडर संघाला आवश्यक ठरू शकतो आणि मी त्या भूमिकेसाठी तयार आहे.” तो पुढे म्हणाला, “संघाला जेव्हा जेव्हा माझी गरज भासेल, तेव्हा मी खेळण्यासाठी तयार असेन. उद्याच मला बोलावले तरी मी तत्काळ जाण्यास तयार आहे.”
सध्या शार्दुल ठाकूर रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या संघात लवकरच यशस्वी जयस्वालही सामील होणार आहे. शार्दुलने सांगितले की जयस्वाल रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या फेरीत मुंबईसाठी खेळणार आहे.
जयस्वाल अलीकडे टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे मालिकेसाठी गेला होता. मात्र, त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही आणि तो तिन्ही सामन्यांत बाकावर बसलेला होता. तसेच टी20 मालिकेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे आता यशस्वी जयस्वाल (Yashavi jaiswal) भारतात परत येऊन रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार आहे.
Comments are closed.